आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात 190 शाळांची नोंदणी:‘आरटीई’अंतर्गत प्रवेशासाठी अखेर साेडत‎ जाहीर; आता एसएमएस येण्याची प्रतीक्षा‎

अकाेला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण ‎ ‎ अधिनियमाअंतर्गत (अारटीई) खासगी ‎ ‎ शाळांमध्ये प्रवेशासाठी साेडत प्रक्रिया‎ बुधवारी झाली. मात्र संकेतस्थळाचे सर्व्हर ‎ ‎ डाऊन झाल्याने अर्ज करणाऱ्या पालकांना‎ मनस्ताप सहन करावा लागला.‎ पालकांना प्रवेशासाठीचे एसएमएस‎ येण्यास सुरूवात हाेणार अाहे. त्यानंतर‎ प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ हाेईल. एकूण १,९४६‎ जागांसाठी ७,१२७ अर्ज प्राप्त झाले.‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎

बालकांच्या मोफत व सक्तीच्या‎ शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार‎ खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये‎ प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व‎ दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव‎ ठेवण्याची तरतूद आहे. आरटीईमुळे‎ पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी‎ शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार‎ होत आहे. आरटीईअंतर्गत प्रवेश‎ मिळण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली अाहे.‎ प्रथम शाळांची नाेंदणी, अाॅनलाइन अर्ज‎ भरण्याची प्रक्रिया १ मार्चपासून सुरू झाली‎ हाेती.आरटीईअंतर्गत प्रवेशाबाबत गोंधळ‎ निर्माण हाेताे. परिणामी सामना पालकांनाच‎ करावा लागतो. यंदा साेडतीच्या दिवशीच‎ संकेतस्थळ तांत्रिक अडचणीमुळे बंद‎ झाल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण‎ दिसून आले.‎