आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याची व्यवस्था:महानगरपालिका मुख्य कार्यालयात अखेर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था; प्रशासनाने आता नादुरुस्त वॉटर कुलर केला सुरू, नागरिकांना दिलासा

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुर्तास सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे जिवाची काहिली होत आहे. परंतु विविध कामांसाठी नागरिकांना महापालिका कार्यालयात यावेच लागते. भर उन्हात आल्यामुळे पाण्याची गरज भासते. मात्र महापालिकेने सर्व सामान्य नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न केल्याने नागरिक महापालिका कार्यालय परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत होते. आता प्रशासनाने नादुरुस्त वॉटर कुलर सुरु केला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महापालिकेत एक वॉटर कुलर सुरु करण्यात आला होता. मात्र देखभाल दुरुस्ती अभावी हा वॉटर कुलर गेल्या अनेक महिन्यापासून बंद पडला होता. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. नागरिकांना मालमत्ता कर, पाणीपट्टी, जन्म-मृत्य दाखल, विवाह नोंदणी, परवाना, नकाशा मंजुरी या कामांसह विविध समस्या घेवून नागरिक महापालिकेत येतात. उन्हाची तिव्रता वाढली असली तरी नागरिकांचे जाणे-येणे फारसे कमी झालेले नाही. मात्र भर उन्हात आल्या नंतर नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गरज भासते.

परंतु महापालिकेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच नसल्याने विविध कामांसाठी आलेले नागरिक विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. प्रशासनाने किमान महापालिकेत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. प्रशासनाने नादुरुस्त वॉटर कुलर सुरु केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...