आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याेजना:अखेर दुर्धर आजारग्रस्त मदत याेजनेला मुहूर्त; पहिल्या टप्प्यात 55 रुग्णांना लाभ

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल पाच महिन्यांच्या विलंबानंतर दुर्धर आजारग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठीचा ठराव प्रशासकीय मंजुरीसाठी जि. प. च्या सर्वसाधारण आणि स्थायी समिती अशा दाेन्ही सभांत मांडला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ५५ लाभार्थी पात्र ठरले आहेत. त्यामुळे आता तरी विनाविलंब गरजू रुग्णांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा कशी हाेईल, यासाठी जि. प. आरोग्य विभागाला हालचाली कराव्या लागतील..

ग्रामीण भागातील रहविासी, कमकुवत आर्थिक परिस्थिती असलेल्या दुर्धर आजारी रुग्णांना मदत देण्यात येते. जि. प.च्या आरोग्य विभागाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात ३५ लाखाची तरतूद केली. गतवर्षी ५५ लाभार्थ्यांना निधीअभावी मदत मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांनाही यंदा मदत देण्याचा निर्णय घेतला. अखेर २ सप्टेंबरच्या स्थायी समिती सभेत प्रशासकीय मंजुरी दिल्याने गरजूंना लाभ मिळण्याचा मार्ग माेकळा झाला.

यांना मिळणार लाभ
हदय राेग, किडनी व कर्कराेगाने ग्रस्त असलेल्या पिडीतांना आर्थिक मदत देण्याची याेजना जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. यासाठी संबंिधत रुग्ण हा ग्रामीण भागातील रहविासी असावा, भूमीहिन, अल्पभूधारक, दारित्र्य रेषेखालील अथवा स्वातंत्र्य सैनिक असल्यास त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. रुग्ण हा दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे प्राधिकृत वैद्यकीय संस्थेच्या तज्ज्ञ डाॅक्टरांचे अथवा जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे.

सभेतच घेतल्या स्वाक्षऱ्या
दुर्धर आजारग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठीच्या याेजनेला प्रशासकीय मंजुरी महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला. मात्र इतविृत्त तयार न झाल्याने हा ठराव शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत ठेवण्यात आला. हा ठरावाला सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली. सभेतच पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या.

सत्ताधारीही आक्रमक
दुर्धर आजारग्रस्तांच्या मदतीच्या याेजनेला प्रशासकीय मंजुरी न मिळाल्याने काही दविसांपूर्वी झालेल्या अर्थ समितीच्या सभेत सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीच्या सदस्या आणि प्रभारी अर्थ समिती सभापती पुष्पा इंगळे यांनी जाब विचारला हाेता. प्रशासकीय मंजुरी जून महिन्यातील सर्व साधारण सभेत मंजुरी देण्यात आली. मात्र अद्याप इतविृत्त अंतमि झालेले नसल्याने त्यांनी नी थेट विद्यमान अध्यक्षा प्रतिभा भाेजने व त्यांच्या स्वीय्य सहाय्यकांशी संपर्क साधला हाेता. तातडीने इतविृत्त अंतमि करण्याची मागणी इंगळे यांनी केली.

राजकीय कुरघाेडी टळली दुर्धर आजारग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठीचा ठराव यापूर्वी जून महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला हाेता. मात्र इतविृत्त तयार न झाल्याने याेजना रखडली. त्यामुळे शुक्रवारच्या स्थायी समितीच्या सभेत मांडण्यात आला. यावर शविसेना सदस्यांना यापूर्वी सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठराव आता पुन्हा स्थायी समितीच्या सभेत का ठेवण्यात येत आहे, असा सवाल करून सत्ताधाऱ्यांना काेंडीत पकडण्याची संधी हाेती. मात्र त्यांनी सभेतच ठरावावर स्वाक्षरी घेण्याची मागणी केल्याने ठराव मंजूर झाला आिण राजकीय कुरघाेडी टळली.

बातम्या आणखी आहेत...