आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती:अखेर आनंदाच्या शिधा वितरणाला प्रारंभ;‎ अकाेल्यात 3 लाख 31 हजार लाभार्थी‎

अकाेला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा व‎ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ जयंतीनिमित्ताने शिधा‎ पत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा‎ वितरीत करण्याच्या प्रक्रियेला‎ बुधवारी प्रारंभ झाला. आमदार‎ रणधीर सावरकर व जिल्हाधिकारी‎ नीमा अरोरा यांच्या हस्ते प्रातिनिधीक‎ स्वरुपात लाभार्थ्यांना आनंदाचा‎ शिधा वितरण करण्यात आले.‎ जिल्ह्यात ३ लाख ३१ हजार ३५७‎ लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांच्या‎ माध्यमातून शिधा वितरीत हाेणार‎ आहे. . जिल्हाधिकारी कार्यालय‎ परिसरात ‘आनंदाच्या शिधा’‎ वाटपाचा कार्यक्रम झाला. या वेळी‎ जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु.‎ काळे, पुरवठा अधिकारी प्रतिक्षा‎ देवणकर, भाजपचे महानराध्यक्ष‎ विजय अग्रवाल, शिवसेनेचे‎ जिल्हाध्यक्ष (शिंदे गट) विठ्ठल‎ सरप, अश्विन नवले, महाराध्यक्ष‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ याेगेश अग्रवाल,शशीकांत चोपडे‎ प्रामुख्याने उपस्थित हाेते.

‎ कार्यक्रमाला स्वस्त धान्य दुकानदार‎ संघटनेचे महेश शर्मा यांच्यासह‎ लक्ष्मणराव कडू ,विलास कारंडे‎ ,पंकज अवस्थी, अतुल कमलाकर,‎ विजय गुप्ता, राहुल रूंगटा उपस्थित‎ होते. या वेळी कार्यक्रमाचे‎ प्रास्ताविक संचालन व आभार‎ संघटनेचे सचिव अमोल सातपुते‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यांनी केले.‎ या वस्तू िमळणार ?‎ १)आनंदाच्या शिध्यात‎ लाभार्थ्यांना १०० रुपयांत १ किलो‎ रवा, १ किलो हरभरा डाळ, १ किलो‎ साखर आणि १ लिटर पामतेल‎ देण्यात येणार आहे. ‘ई-पॉस’ची‎ व्यवस्था नसलेल्या ठिकाणी‎ ऑफलाइन पद्धतीने हा शिधा देण्याचे‎ नियाेजन आहे.‎ २) सध्या ९८ टक्के शिधा‎ जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. यात ३‎ लाख ४५ हजार ६११ किलाे तेल,‎ साखर -१ लाख ७५ हजार ८१४‎ किलाे, डाळ-३ लाख ३२ हजार ६४३‎ किलाे आणि रवा २ लाख ९८ हजार‎ ३१२ िकलाेंचा सामवेश आहे.‎

या केंद्रांवर हाेणार िवतरण‎ अंत्योदय अन्न योजना, शेतकरी‎ व प्राधान्य कुटूंब योजनेतील ३ लाख‎ ३१ हजार ३५७ लाभार्थी‎ शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा‎ शिधा वितरीत होणार आहे.‎ सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत‎ १ हजार ०६१ स्वस्त धान्य‎ दुकानाव्दारे आनंदाचा शिधा‎ वितरण होणार आहे. त्यात अकोला‎ तालुक्यातील १२४, अकोला ग्रामीण‎ १७४, बार्शीटाकळी १२७, मुर्तिजापूर‎ १६३, बाळापूर ११४, पातूर ९४,‎ तेल्हारा ९९ व अकोट १६६ केंद्रावर‎ वितरीत होईल, अशी माहिती‎ जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यू.‎ काळे यांनी दिली.‎