आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेला दणका:अखेर जि.प.च्या हातरूण सर्कलसाठी निवडणूक जाहीर; शिवसेनेला दणका ; जिल्हा परिषद, विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषित केले

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या हातरूण सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्या सुनीता सुरेश गोरे यांना विभागीय आयुक्तांनी पुन्हा अपात्र घोषित केल्यानंतर बुधवारी ११ मे रोजी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

आयुक्तांच्या आदेशाविरोधात शिवसेनेने न्यायालयीन लढाईसाठी तयारी केली होती. मात्र आता निवडणूक जाहीर झाल्याने संख्याबळ कायम ठेवण्याचे आव्हान शिवसेनेसमोर उभे ठाकणार असून, एक सदस्य वाढवण्याची संधी सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीला आहे. निवडणूक असलेल्‍या क्षेत्रामध्‍ये आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा निवडणूक विभागाचे प्रभारी अधिकारी संजय खडसे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...