आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील जनता शिक्षण संस्थाद्वारा संचालित डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी कला महाविद्यालयाचा गृहअर्थशास्त्र विभाग, अर्थशास्त्र विभाग, महिला उद्योजकता कक्ष व वरुड येथील सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्थेतर्फे एक दिवसीय वित्तीय साक्षरता व उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. अविनाश धोबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. लीना गावंडे, डॉ. नलिनी बोडखे, संध्या चौधरी, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. दिनेश खेरडे, गृह अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. लुंबिनी गणवीर, ग्रंथपाल डॉ. राजेश बोबडे उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा. दिनेश खेरडे यांनी तर पाहुण्यांचा परिचय डॉ. राजेश बोबडे यांनी करून दिला. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात मुंबईच्या तृप्ती पाटील यांनी वित्तीय साक्षरता या विषयावर महत्त्वपूर्ण व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी कॅशलेस व्यवहार, शेअर मार्केटमधील गुंतवणूक, दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे आदी विषयांची मांडणी केली. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात उद्योजकता प्रशिक्षणांतर्गत ब्लॉक प्रिंटिंगचे कृती प्रशिक्षण देण्यात आले.
टेबल क्लॉथ, पिलो कव्हर, कुशन कव्हर, साडी, स्कार्फ, चादर, कुर्ती, ड्रेस मटेरियल यावर विविध नक्षीचे ब्लॉक प्रिंटिंग कसे करावे, हे यावेळी शिकविण्यात आले. सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्थेच्या संध्या चौधरी यांनी याबाबतची प्रात्याक्षिके करुन दाखवली. ब्लॉक प्रिंटिंग ही अतिशय पुरातन कला असून तरुणांसाठी ब्लॉक प्रिंटिंग हा उत्तम स्वयंरोजगार होऊ शकतो, हेही त्यांनी पटवून दिले. प्रथम सत्राचे प्रास्ताविक गृहअर्थशास्त्र विभागप्रमुख व महिला उद्योजकता कक्षाच्या समन्वयक प्रा. लुंबिनी गणवीर यांनी केले. संचालन पायल पाटील यांनी केले तर आभार पल्लवी गुल्हाने यांनी मानले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी प्राचार्य डॉ. रा.ना. फुलारी यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेला महाविद्यालयाचे विद्यार्थी, महात्मा फुले महाविद्यालय व स्व. पंचफुलाबाई पावडे महिला महाविद्यालयाच्या गृहअर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनी तसेच सर्वज्ञ बहुउद्देशीय संस्थेच्या शिक्षिका रुपाली वानखडे व प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.