आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधनियिमाअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी सोडतीमध्ये नविड झालेल्या १,९२० पैकी १, ४२६ मुलांचा मंगळवारी अखेरच्या दिवशी प्रवेश निश्चित झाला. नविड झालेल्या यादीतील मुलांच्या दस्तावेज पडताळणीची प्रकिया १० मे रोजी संपली असून, अद्याप तरी मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे उर्वरित ४९४ जागांवर आता प्रतीक्षा यादीतून प्रवेश निश्चित करणार आहे. या प्रक्रियेसाठी तीन-चार दविसांत हालचाली सुरू होतील.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधनियिमानुसार खासगी वनिाअनुदानित शाळांत प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. आरटीईमुळे पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे. दरम्यान यंदा आरटीई कोट्यातून प्रवेश मिळावा, यासाठी एकूण अर्ज करणाऱ्या पालकांची संख्या ६००३ आहे. लाॅटरीपद्धतीने प्रवेशाची संधी मिळालेल्या मुलांच्या कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रियाही १० मे रोजी संपली.
ही आहेत कारणे : शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक पालक पाल्यांसाठी केवळ अर्ज करतात. मात्र आवश्यक दस्तावेज संकलित न झाल्यास ते पडताळणीसाठी येत नाहीत. परिणामी नविड यादीतील जागा रिक्तच राहतात.
काय होते संचालकांच्या पत्रात?
नविड यादीतील विद्यार्थ्यांसाठी कागदपत्रे छननी व प्रवेश निश्चितीसाठी १० मे ही अंतमि तारीख होती, याबाबत पालक, शाळा, शैक्षणिक संस्थांना कळवावे, असे पत्र शिक्षण संचालकांनी ९ मे रोजी िशक्षणाधिकाऱ्यांना पाठवले होते. यापूर्वी नविड यादीतील प्रवेशासाठी मुदत १० एप्रिल, ३० एप्रिल आिण १० मेपर्यंत वाढवली होती. मुदत वाढ दिल्यानंतरही निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होऊ शकले नाहीत.
येथे झाली प्रक्रिया
अर्जांची सोडत ४ एप्रिलला शासन स्तरावरून काढली. त्यानुसार अर्ज करणाऱ्या ६००३ विद्यार्थ्यांपैकी १,९२० विद्यार्थ्यांची नविड लॉटरी पद्धतीने केली आहे. संबंधितांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया ११ एप्रिलपासून सुरूवात झाली. ही प्रक्रिया अकोल्यात जि.प. सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात आणि तालुक्यात पं.स.स्तरावर सुरू होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.