आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कावड महोत्सवाला प्रारंभ:पहिला मान खोलेश्वराला; बार्शीटाकळी येथे ठीक-ठिकाणी कावडचे जल्लोषात स्वागत

अकोला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिना सुरू होताच अकोला जिल्ह्यामध्ये कावड यात्रेला सुरुवात होते. अकोल्याचे आराध्य दैवत राज राजेश्वर मंदिरासह तालुकास्तरावर कावळ यात्रेचे उत्साहात आयोजन करण्यात येते. पहिल्या श्रावण सोमवारी बार्शीटाकळी येथील खोलेश्वर पुरातन मंदिरातील शिवलिंगाला जलाभिषेक करण्यात आला. यावेळी कावड- पालखीचे बार्शिटाकळी वासियांनी जल्लोषात स्वागत केले.

सकाळपासून मंदिरामध्ये भक्तिमय सुरू

अकोला बार्शीटाकळी तालुक्यातील खोलेश्वर मंदिर हे अतिशय पुरातन आहे. येथील शिवलिंग तळघरातमध्ये स्थापित आहे. त्यामुळे दर्शनासाठी भाविकांना पाण्यातून वाट काढावी लागते. जिल्ह्यामध्ये पहिल्या श्रावण सोमवारी या मंदिरामध्ये जलाभिषेक केला जातो. यासाठी कावडधारी पूर्णा नद्यांमधून कावडीने जल भरून आणतात. रविवारी कावडधारी नद्यांमधून जल आणण्यासाठी निघाले. रात्री कावडच्या घागरी पाण्याने भरल्यानंतर पायी सोमवारी सकाळी बार्शीटाकळी येथे पोहोचले.

विविध मंडळांकडून कावडीचे स्वागत

रविवारी सकाळी बार्शिटाकळी शहरांमध्ये पोहोचलेल्या कावड पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरामध्ये मानाची कावड सर्वप्रथम मंदिराकडे मार्गस्थ झाली. त्यानंतर जवळपास 15 ते 20 लहान-मोठ्या पालखी, कावड खोलेश्वराच्या जलाभिषेकासाठी रवाना झाल्या. या मिरवणुकीचे विविध मंडळांतर्फे स्वागत व पूजन करण्यात आले. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या कावडी मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या.

दुपारपासून जलाभिषेक प्रारंभ

सकाळी शहरात पोहोचलेल्या कावड दुपारपर्यंत मंदिरांमध्ये दाखल झाल्या. येथे पूजा आरतीनंतर महादेवाच्या पिंडीला जलअर्पण करण्यात आले. विविध कावड मंडळांकडून जल अर्पण करण्याचा कार्यक्रम सायंकाळपर्यंत चालतो. कावड यात्रेनिमित्त मंदिरामध्ये दिवसभर गर्दी होती. कोरोनाच्या दोन वर्षानंतर कावड पालखीतील देखावेही यंदा आकर्षणाचा केंद्र ठरले होते.

बातम्या आणखी आहेत...