आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहान धरण अकोल्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवते. यावर्षी पाऊस उशिरा हाेत आहे. मृग नक्षत्राच्या ११ व्या दिवशी गुरुवारी १६ जूनला रात्री १.३० व शुक्रवारी १७ जूनच्या सकाळी ७ वाजता दरम्यान महान धरण परिसरातील महान पाटबंधारे विभागाच्या पर्जन्य मापन यंत्रातील नोंदीनुसार यावर्षी पावसाळ्यात प्रथमच ४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सद्यःस्थितीत महान धरणाचा जलसाठा २५.८१४ दशलक्ष घनमीटर आहे. धरणाचे ५ पैकी दोन व्हॉल्व्ह पाण्यावर असून, उर्वरित ३ व्हॉल्व्ह पाण्याखाली आहे. धरणाच्या जलसाठ्याकडे बोरगाव मंजू येथील उपकार्यकारी अधिकारी अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महान येथील शाखा अभियंता प्रिया आगरकर, मनोज पाठक यांनी मोजणी केली. सुरुवातीलाच चांगल्या पावसाची नोंद झाल्यामुळे अकोला शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता दूर होणार आहे. जिल्ह्यात ५७.४ मिलिमीटर पाऊस : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ५७.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यात अकोला तालुक्यात सर्वाधिक ९४.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर इतर सर्वच तालुके ७० मिलिमीटरच्या आत आहेत. १९.५ मिलिमीटर एवढा सर्वात कमी पाऊस अकोट तालुक्यात झाला आहे. त्यामुळे एकंदरीत जिल्ह्यात सर्वत्र पेरणीलायक पावसाची प्रतीक्षा कायम आहेत. दरम्यान, नागपूरच्या प्रादेशिक हवामान संशोधन केंद्राकडून प्राप्त झालेल्या हवामानाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात १८ आणि १९ जूनला तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासहृ मेघगर्जना व पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. अल्प पावसात पेरणीची घाई टाळा : जिल्ह्यातील अनेक भागात अद्याप पेरणीसाठी आवश्यक पाऊस नसल्याने होता. त्यानंतर पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट होत आहे. मुख्य पाइपलाइनच्या जोडणीचे काम सुरू असल्याने पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेता तत्काळ या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.