आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Five Days Partly Cloudy Weather In The District; There Is No Heat Wave In Vidarbha, But Ukada Persists In The District | Marathi News

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्यात पाच दिवस अंशत: ढगाळ वातावरण; विदर्भात उष्णतेची लाट नाही, जिल्ह्यात मात्र उकाडा कायम

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढत असतानाच वातावरणात बदल होऊन विदर्भात अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पुढील पाच दिवसांत विदर्भात कोठेही उष्णतेची लाट राहणार नाही. कमाल, किमान तापमानात बदल होण्याची शक्यता कमी आहे, असा अंदाज हवामान अभ्यासक व्यक्त करतात.

१५ मार्चपासून विदर्भात तापमान वाढण्यास सुरूवात झाली. त्यात अकोला सर्वोच्च स्थानी राहिले. मार्चमध्ये ४१ अंशांपासून सुरू झालेला कमाल तापमानाचा पारा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात ४४ अंशांवर पोहोचला त्यामुळे अकोलेकरांना तीव्र उन्हाचे चटके सोसणे असह्य झाले आहे.

अशात पश्चिम विदर्भ ते पूर्व उत्तर प्रदेश पर्यंत ९०० मीटर उंचीवर कमी दाबाची द्रोनिय स्थिती असल्यामुळे विदर्भात अंशतः ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहत आहेत. या वातावरणातील बदलामुळे अकोल्यासह विदर्भात पुढील पाच पाच दिवस कमाल आणि किमान तापमान आहे तसेच राहील.

विदर्भात कोठेही उष्णतेची लाट राहणार नाही. तसेच पुढील पाच दिवस विदर्भात कुठेही पावसाची शक्यता नाही, अशी माहिती हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांनी दिली.