आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितीरिवाजाप्रमाणे विधी पुर्ण:पराग गवई यांच्याकडून पाच मृतदेहांवर विधिवत अंत्यसंस्कार

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी पराग गवई यांनी पाच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यापैकी चार अनोळखी होते. अकोट फैल पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या उगवा येथील ४० वर्षीय रणजीतसिंग नवलसिंग ठाकूर हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या वाॅर्ड क्रमांक सहामध्ये दाखल होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोलिस प्रशासनाने त्यांच्या नातेवाइकांसोबत संपर्क साधला. परंतु आर्थिक अडचणींमुळे पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून पराग गवई यांना माहिती देण्यात आली. गवई यांनी रितीरिवाजाप्रमाणे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

सिटी कोतवाली ठाणे हद्दीतील शासकीय रुग्णालयाच्या परिसरात एका ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला. सर्वोपचारच्या परिसरात एका अंदाजे ७० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. बिलाला भवन न्यू राधाकिसन प्लॉट येथे ४५ वर्षीय पुरुषाच‍ा मृतदेह आढळून आला होता. तसेच सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या चार व्यक्तींच्या नातेवाइकांचा पोलिस प्रशासनाने शोध घेतला असता कोणीही आढळून आले नाही. पोलिसांकडून ही बाब पराग गवई यांना माहित होताच पोलिसांच्या परवानगीने त्यांनी पाच मृतदेहांवर मोहता मिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. या वेळी प्रा. डॉ. प्रसन्नजीत गवई, प्रा. डॉ. धम्मपाल भदे, विजय कांबळे, अनिल उपर्वट, मिठाराम लोंढे, श्री. शिरसाट, संकेत शिरसाट, सुबोध पाटील, गणेश सोनोने, सचनि ढोरे, अंकित गोपनारायण, मंगेश गवई, विशाल गोपनारायण, मोहम्मद इर्षद, राजू गोपनारायण, आकाश अहिरे, नीलेश वरोटे, अमित तेलगोटे, सुजीत तेलगोटे, प्रज्वल टोबरे, अंसराज तेलगोटे, विशाल तेलगोटे, डी. एस. शिरसाठ, प्रमोद तायडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. सिटी कोतवाली स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कडू, अकोट फैल स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेंद्र कदम, पोलिस कर्मचारी गोवर्धन घायवट, दारासिंग सुखदाने, विकास शिंदे, ज्ञानेश्वर रडके, देविदास गायकवाड, किसन पातोंड, प्रशांत देशमुख, संजय हाडोळे, प्रमोद अटाळकर, अभिषेक पाठक, प्रशांत ठाकरे, सुरज चिंचोळकर, अभिमन्यू आठवले, अनिल खांडेकर, महिला पोलिस कर्मचारी आरती शिरसाट यांचीही या वेळी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...