आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या हिंदी, मराठी, उर्दू माध्यमांच्या ३२ शाळांपैकी पाच शाळांना अखेरची घरघर लागली आहे. या शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत एकूण विद्यार्थ्यांची संख्या ७७ पेक्षा कमी आहे. पुढील शैक्षणिक सत्रात या संख्येत वाढ न झाल्यास यापैकी काही शाळा बंद होवू शकतात.
महापालिका अस्तित्वात आली. त्यावेळी (२००१) हिंदी, मराठी,उर्दू, गुजराती माध्यमाच्या एकूण ७३ शाळा होत्या. अकरा वर्षात विद्यार्थी संख्या घटल्याने शाळांची संख्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी झाली आहे. घसरलेली शैक्षणिक गुणवत्ता, पदाधिकारी आणि प्रशासनाकडून शिक्षण विभागाकडे उदासीनपणे पाहण्याचा दृष्टीकोन आदी बाबींमुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकली नाही. परिणामी आता केवळ ३२ शाळा अस्तित्वात आहेत. या पैकी पाच शाळा कशाबशा तग धरुन आहेत. या शाळेत पहिली ते आठवी पर्यंत एकूण विद्यार्थ्यांची संख्या ७७ च्या आत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या न वाढल्यास या शाळा बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यामुळे विद्यार्थी संख्या घटते आहे महापालिकेने २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षात महापालिका शाळांचा दर्जा वाढावा तसेच विद्यार्थ्यांना खासगी शाळेप्रमाणेच इंग्रजीचे शिक्षण मिळावे, यासाठी केजी-१ वर्ग सुरु करण्यात आला होता. यातून विद्यार्थी वाढवणे हा महत्वाचा उद्देश होता. मात्र दुर्दैवाने पदाधिकारी आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आणि सुरु झालेले केजी-१ वर्ग बंद केले. ही बाबही विद्यार्थी संख्या घटण्यामागचे कारणीभूत आहे. त्याचबरोबर पालकांमध्ये शिक्षणा विषयी वाढलेली जागरुकता देखील कारण आहे.
या शाळांचा आहे समावेश महापालिका शाळांमध्ये एका शाळेत दहावीपर्यंत तर काही शाळेत आठवी आणि काही शाळांमध्ये चौथी ते पाचवीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. मात्र आता विद्यार्थी संख्या घटली आहे. उर्दू मुलांची शाळा क्रमांक तीनमध्ये २३, मनपा हिंदी बालक शाळा क्रमांक दोनमध्ये २८, मुलांची शाळा क्रमांक १२ मध्ये ४८, गुजराती शाळा क्रमांक एकमध्ये ६२ तर मनपा शाळा क्रमांक २२ मध्ये ७६ अशी एकूण विद्यार्थी संख्या राहिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.