आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:हत्येच्या 24 दिवसांनंतर पाच जणांना अटक

अकोला2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या ठाकरे गटाचा उपशहरप्रमुख विशाल कपले यांची ३० ऑक्टोबरला गजबजलेल्या जठारपेठ चौकात दोघांनी चाकू भोसकून हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटकही केली होती. या घटनेचा सखोल तपास केल्यानंतर पोलिसांनी साक्षीदारांचे बयाण, सीडीआर व एसडीआरच्या माध्यमातून पाच जणांनी खुनाचा कट रचल्याचे समोर आले. या पाचही जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांना गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हत्याकांडातील मुख्य आरोपी शिवानंद मनोहर दोरवेकर आणि विनोद कांबळे हे या अगोदर पोलिस अटकेत होते. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करून साक्षीदारांचे जबाब आणि सीडीआर-एसडीआर अॅनालिसिस केले. त्यामध्ये विशाल कपलेच्या हत्येचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे भादंवि कलम १२० (ब) वाढवत पाच आरोपींना अटक केली. यात ज्ञानेश्वर वानखडे (वय ४४), अभिषेक जगताप (वय ३४), रोहन इंगळे (वय २५), अश्विन उर्फ छोटू बळीराम कपले (वय ३३), गोवर्धन जनार्दन कपले (वय ४४) यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...