आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा प्रादुर्भाव:पोहरादेवी गडावरील महंत कबीरदास यांच्यासह घरात 5 जण कोरोना पॉझिटीव्ह, दोन दिवसांपूर्वीच जमले होते हजारो लोक

वाशिम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राठोड 23 फेब्रुवारी पोहरादेवी येथे दाखल झाले होते.

राज्यभरातील कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथे दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या समर्थनार्थ हजारोंच्या संख्येने लोक जमले होते. याच वेळी कोरोनाचा प्रसार होण्याची भीती वर्तवली जात होती. आता ही भीती खरी ठरली आहे. पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराजांसह त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. केल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्ण आढळण्याचा वेग हा झपाट्याने वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियम पाळण्याचे कठोर आदेश दिलेले असतानाही शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून पोहरादेवी येथे हजारोंचा जमाव गोळा केला. यानंतर संजय राठोड यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलेले आहे. या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले वनमंत्री हे जवळपास 15 दिवस जनतेसमोर आलेले नव्हते. दरम्यान संजय राठोड 23 फेब्रुवारी पोहरादेवी येथे दाखल झाले होते. यावेळी संजय राठोड यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. येथे जमलेली गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता.

बातम्या आणखी आहेत...