आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:नवजीवन एक्सप्रेसमधून प्रवाशाच्या बॅगेतून पाच तोळे सोने लंपास

अकोला7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवजीवन एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाच्या ट्रॉलीबॅगमधून चोरट्याने हॅण्डबॅग चोरली. त्यातील पाच तोळे दागिने व ३३ हजारांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गडचिरोली येथील प्रकाश केशवराव शिवणीकर हे कुटुंबियांसह त्यांच्या अकोला येथील मुलाच्या घरी येण्यासाठी २२ नोव्हेंबरला नवजीवन एक्सप्रेसने आरक्षित डब्यातून चंद्रपूर ते अकोला असा प्रवास करीत होते.

रात्री दीड वाजता दरम्यान त्यांना झोप लागली होती. सकाळी पावणेसहा वाजताच्या दरम्यान ते अकोला रेल्वे स्थानकावर उतरले आणि मुलाच्या घरी गेले. घरी गेल्यावर त्यांनी ट्रॉली बँग उघडून बघितली असता त्यात ठेवलेली हॅण्डबॅग दिसली नाही. ती हॅन्डबॅग अज्ञात चोरट्याने चोरल्याची त्यांची खात्री पटली. हॅन्डबॅगमध्ये ३३ हजार रोख, सोन्याचे चेन त्यात बालाजीचे दोन लॉकेट असे अडीच तोळे सोने, दोन तोळ्याची सोन्याची पोथ, सोन्याचे कानातील पाच ग्रॅमचे टॉप्स असा ऐवज होता. शिवणीकर यांनी रेल्वे पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...