आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​संकलानास प्रारंभ:ध्वजदिन निधीच्या संकलनास सुरुवात

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैनिकांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांसाठी ध्वजदिननिधी संकलन करण्यास बुधवारी ध्वजदिनानिमित्त सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजनिधी संकलानास प्रारंभ​​​​​​​ झाला.२०२०-२१ मध्ये जिल्ह्यात दिलेल्या ७६ लाख ३० हजारांच्या ध्वजनिधी संकलनाच्या उद्दिष्टापैकी ९६ टक्के ध्वज निधी संकलन झाल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी दिली.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे ध्वजनिधी दिनाच्या औचित्याने ध्वजनिधी संकलन कार्यक्रमाच्या शुभारंभाचे आयोजन केले. या वेळी अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे, विदर्भ साहित्य संघाचे गजानन नारे आदींनी या वेळी ध्वजनिधीत निधी दान करून या उपक्रमाची सुरूवात केली.

ध्वज निधी संकलनातून संकलीत होणारा निधी एका बँक खात्यात जमा करण्यात येतो. संकलित निधीतून सैनिकांच्या कल्याणासाठी योजना राबवण्यात येतात. जिल्ह्यात गत वर्षी दिलेल्या ७६ लाख ३० हजारांच्या ध्वजनिधी संकलनाच्या उद्दिष्टापैकी ७० लाख ४३ हजारांचा ध्वज निधी संकलन झाल्याचे, यावर्षीही ध्वजनिधीतून मोठी रक्कम संकलीत होणार असल्याचा विश्वास बाबासाहेब गाढवे यांनी व्यक्त केला.

असा असतो संकलन कार्यक्रम : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे ध्वजनिधी दिन ७ डिसेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ध्वजनिधी संकलित करण्यात येतो. यासाठी शाळा,महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळ आदींना आवाहनपत्र पाठवण्यात येते व त्यानुसार ध्वजनिधी संकलित करण्यात येतो.

बातम्या आणखी आहेत...