आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वजारोहण:सांगवी बाजार-वल्लभनगरात ध्वज वितरण, ध्वजारोहण

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सांगवी बाजार-वल्लभनगर गट ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ध्वज वितरण व ध्वजाराेहण करण्यात आले. ध्वजाराेहण शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य भास्कर अंभोरे यांच्या हस्ते आणि शिवसेना उपतालुकाप्रमुख नितीन पाटील ताथोड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संदीप वानखडे हाेते. शाळांमध्ये आणि गावात ध्वज वितरण करण्यात आले. ग्रामपंचायत सचिव हिम्मत राठोड, उपसरपंच जयश्री सतीश वानखडे, ग्रामपंचायत सदस्य अजय डाबेराव, मंदा वानखडे, किशोर हलवणे, निकिता माकोडे, विवेक गावंडे, करुणा राठोड, संगीता मोरे, ग्रा. पं. कर्मचारी नरेंद्र वानखडे, कर्मचारी उमेश राठोड, रोजगार सेवक शंकर हलवणे, मुख्याध्यापक डाखोरे, केंद्रप्रमुख साहेबराव पातोंड, आशा सेविका कुसुम मांगुळकर तसेच गावातील नागरिक आश्विन राठोड, अमर सोळंके, संतोष डाबेराव, संतोष राऊत, गोपाल राऊत, उमेश राठोड, छोटू हलवणे, सागर चांदुरकर, रमेश उमाळे, कैलास राऊत, वैभव कोकळकार, मधुकर काळे, पुरुषोत्तम वानखडे, माजी सैनिक तथा पोलिस पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...