आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव:देवळी येथे सैन्यातील जवानांच्या हस्ते ध्वजारोहण ; अमोल खाडे यांचे मार्गदर्शन

अकाेला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सैन्यातील जवानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घराेघरी तिरंगा अभियान देवळीच्या सरपंच वैशाली विकास सदांशिव व ग्रामसेवक अमोल खाडे यांच्या मार्गदर्शनात उत्साहात राबवले. ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण साेहळा आयाेजित केला.

सरपंच वैशाली सदांशिव यांनी ध्वजारोहण आर्मीतील जवानांच्या हस्ते करण्याची परंपरा सुरू केली. त्यानुसार सैनिक शुभम विजय सदांशिव व सैनिक मंगेश बाळू सदांशिव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ही परंपरा कायम ठेवली. कार्यक्रमाला सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह ग्रा. पं. सदस्य देवानंद सदांशिव, रूपाली नवलकार, वृषाली बोबडे, गणेश निमकंडे, मंदा राऊत, कल्पना सदांशिव, तंटामुक्ती अध्यक्ष बंडू सदांशिव, पोलिस पाटील अशोकराव बोबडे, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक गजानन निखाडे, मनीष म्हस्के, सुरेंद्र सदांशिव, कारगिल शहीदपूत्र दीपक भास्करराव पातोंड, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक अनंता वाघ, शिक्षक संजय पाटील, शत्रुघ्न अंभोरे, शिक्षिका नम्रता पाटील‌ यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...