आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Flag Salute At The Hands Of District Collector On Maharashtra Day; Various Events At Lal Bahadur Shastri Stadium, Presence Of Dignitaries And Key Officials |marathi News

राज्याचा वर्धापन दिन:महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन; लाल बहाद्दूर शास्त्री स्टेडियम येथे विविध कार्यक्रम, मान्यवरांसह प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती

अकोला16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र दिनाचा जिल्ह्याचा मुख्य शासकीय समारंभ लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

मुख्य शासकीय सोहळ्यास मनपा आयुक्त कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी अनील खंडागळे, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, सहाय्यक आयुक्त कामगार कल्याण राजू गुल्हाने तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. अंजिक्य अडव्हेंचर ग्रुपचे संचालक धनंजय भगत व त्याच्या चमूस जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गाडगे यांनी केले.जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पोलीस दलाच्या वाद्यवृंदाने वातावरण भारावून गेले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी अरोरा यांनी परेड निरीक्षण केले.

पोलिस, होमगार्ड व विविध पथकांनी शानदार संचालन केले. यानिमित्ताने सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा जागर करण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलचे फित कापून उद्घाटन जिल्हाधिकारी अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिके व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यात खालील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धा
विविध अभियान, स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला
१) राज्यस्तरीय ‘तृतीय पारितोषिकः- निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले, अधीक्षक मिरा पागोरे, समन्वयक गजानन महल्ले.
२) ‘सुंदर माझे कार्यालय’ पुरस्कारः- जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला, उपविभागीय अधिकारी कार्यालय, मूर्तिजापूर, तहसील कार्यालय, पातूर.
३) ‘सुंदर माझा टेबल’ (जिल्हा स्तरीय कर्मचारी): अव्वल कारकून अभय पाठक, आस्थापना शाखा -प्रेमा हिवराळे, अव्वल कारकुन- शशीकांत देशपांडे, नाझर- मोहन साठे.
४) तालुकास्तरीय कर्मचारी:- महसूल सहा. उमा गावंडे,तहसीलदार कार्यालय अकोला, महसूल सहा. सचिन बागडे, उपविभागीय कार्यालय, मूर्तिजापूर, अव्वल कारकून-उज्वला सांगळे, बार्शीटाकळी तहसील कार्यालय.

बातम्या आणखी आहेत...