आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्माष्टमीनिमित्त सजला बाजार:बासरी, मटकी, पोषाखांमध्येही विविध मनमोहक प्रकार; दहिहंडीचे निर्बंध नसल्याने उत्साहाला उधाण

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावणातील खास सणांपैकी एक आहे. कृष्ण जन्माष्टमी सर्व घरांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. उद्या लड्डू गोपालाचे घर-घरांमध्ये आगमन होणार आहे. लाडक्या कृष्णाच्या आगमनाच्या तयारीला अकोलेकर लागले असून कान्हाला सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, पाळणे आणि पोषाख खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली आहे.

यंदा बाजारात चिनी मालाला मागणी नाही. भगवान श्री कृष्णाचे पाळणे, सिंहासन, श्रृंगार सामान आणि पोषाखांना सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय लड्डू गोपाल, बासरी वाजवणारे कान्हा, माखन खाणारे कान्हा, मोरपंख धारण केलेले कान्हा, श्री राधा कृष्ण व अन्य मूर्तींना अधिक पसंती आहे. श्री कृष्ण आणि राधेचे परिधान 50 ते 500 रुपयेपर्यंत विकल्या जात आहे. तसेच विविध आकर्षक पाळणे 200 ते 2000 रुपयेपर्यंत आहेत. कोरोनानंतर प्रथमच बाजारात गोकूळ अष्टमिचा उत्साह दिसून येत असल्याचे विक्रेते सांगतात.

घराघरात, मंदिरात तयारीला सुरूवात

जन्माष्टमीच्या दिवशी घरे, मंदिरे आणि बाजार भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती आणि सुंदर तबकांनी सजवले जातात. यादिवशी विविध प्रकारची मिठाई आणि पदार्थ बनवून श्रीकृष्णाला 56 प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. यामुळे कृष्ण जन्माष्टमीची तयारीला अनेक दिवसांपासून सुरुवात झाली आहे.

दहिहंडीचा उत्साह जोरात

यंदा प्रशासनाच्या वतिने दहिहंडीवरील सर्व निर्बध उठविले आहे. त्यामुळे दहिहंडीचे आयोजन करणाऱ्या मंडळांमध्ये प्रचंड उत्साह आहे. गुरुवारी, तसेच पुढल्या आठवड्यात अनेक मंडळांकडून सार्वजनिक दहिहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय अनेक शाळांमध्येही हा उत्सव जोषात कार्यक्रम होणार आहे.

अशा आहेत वस्तूंच्या किंतमी

बासरी - 10 ते 200 रूपये

पोषाख - 50 ते 2 हजार रूपये

दहिहांडी - 100 ते 500 रूपये

मुकूट - 100 ते 3 हजार रूपये

बाजूबंद - 30 ते 200 रूपये

पैंजण - 50 ते 200 रूपये

हार - 100 ते 500 रूपये

पाळणे - 200 ते 5 हजार रूपये

शेला - 20 ते 100 रूपये

बातम्या आणखी आहेत...