आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय हवामान विभाग यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. 24 जुलैपर्यंत जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत नदी नाला काठावरील गावांना व शहरी भागातील सखल भागातील वस्त्यांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी, नाले, तलाव, बंधारे येथे जलसाठा जमा होत असल्याने त्यामध्ये पोहण्यास जाऊ नये. रस्त्यावरून, पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहने नेण्याबाबत दक्षता घ्यावी. तसेच स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाचे नायाब तहसिलदार एस. पी. ढवळे यांनी केले आहे.
काही दिवासांपासून जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शहर व सभोवतालच्या परिसरातील पर्यटनस्थळी नागरिक व पर्यटन प्रेमीची वर्दळ वाढली आहे. अशा ठिकाणी जास्त गर्दी झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने मृद व जलसंधारण विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व गाव तलाव, पाझर तलाव, साठवण तलाव, सिंचन तलावाच्या स्थळी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा स्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न नागरिकांनी करू नये. आदेशाचे पालन न करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच नागरिकांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करून मृद व जलसंधारण विभागास सहकार्य करावे, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी केले.
या तलावांवर प्रवेश निषेध
अकोला जिल्ह्यातील बोरगाव, सिंसा, उदेगाव, कुंभारी, सुकळी, घोंगा, पिंपळशेंडा, कानडी, भिलखेड, चिचपाणी, धारूर, सावरगाव बु, झ्रंडी, हिवरा, कऱ्ही, पूनौती, वडगाव, पारस, गायगाव, कवळा, कोथळी, आखतवाडा, मोयापाणी, वाघा, धानोरा, पाटेकर, दधम, व हसनापूर येथील सर्व गाव तलाव, पाझर तलाव, साठवण तलाव, सिंचन तलावाच्या स्थळी पुढील आदेश होईपर्यंत प्रवेश निषेध करण्यात आल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.