आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • For Two Years, The Salaries Of Contract Employees Have Been Stagnant For Three And A Half Months, But The Problem Has Always Been; Who Should Ask For The Right Money? | Marathi News

वेतन रखडले:दोन वर्षांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे साडेतीन महिन्यांचे वेतन रखडलेलेच, आयुक्त आले-गेले, समस्या मात्र कायमच; हक्काचे पैसे कोणाकडे मागावे

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाचे तब्बल साडेतीन महिन्याचे वेतन मागील दोन वर्षापासून मिळालेले नाही. विशेष म्हणजे या कंत्राटी कर्मचाऱ्यांना केलेल्या कामाचा मोबदला देण्याबाबत महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी गटाने दुर्लक्ष केले तर आता पर्यंत महापालिका आयुक्त आले आणि गेले तरी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या अद्यापही जैसे-थे आहे. त्यामुळे आपल्या हक्काचे पैसे कोणाकडे मागावेत? असा प्रश्न महापालिकेत कार्यरत या १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

महापालिकेने तांत्रिक कर्मचाऱ्यामुळे काम विस्कळीत होवू नये, यासाठी महापालिकेने कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्त करण्यात आले. कंत्राटी कर्मचारी नियुक्त करताना महापालिकेने संबंधित कंत्राटदाराला निश्चित केलेल्या वेतनानुसार पीएफचा भरणा करणे अत्यावश्यक होते. मात्र निश्चित केलेल्या वेतनापेक्षा कमी वेतन महापालिकेतील या कंत्राटी कर्मचाऱ्यांना संबंधित कंपनीने दिले. एकीकडे महापालिकेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी वेतन दिल्या नंतर नियमानुसार भराव्या लागणाऱ्या पीएफची रक्कम भरली नाही. त्यामुळे कंत्राटदाराने महापालिकेशी केलेल्या कराराचा भंग केला. याबाबत काही नगरसेवकांनी आक्षेप घेतल्या नंतर महापालिकेकडून त्या कंत्राटदाराचे देयक थांबवण्यात आले. तसेच त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले. मात्र नवीन व्यवस्था होई पर्यंत संबंधित कंत्राटदारालाच महापालिकेला कर्मचारी पुरवण्याचे आदेश देण्यात आले. महापालिकेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनीही आपली जबाबदारी पूर्ण पाडून कर्तव्य बजावले. मात्र केलेल्या कामाचा मोबदला मात्र या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाला नाही.

विशेष म्हणजे महापालिका स्थायी समितीच्या सभेमध्ये या विषयावर गेल्या दोन वर्षात अनेकदा चर्चा झाली. मात्र महापालिकेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना अद्यापही आपल्या कामाचा मोबदला मिळाला नाही. तर महापालिका प्रशासनानेही या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गंभीर समस्येची दखल घेतली नाही. परिणामी कंत्राटी कर्मचारी आपल्या हक्काच्या वेतनापासून वंचित आहेत.

बातम्या आणखी आहेत...