आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेणतीही लेखी सूचना न देता कामावरून कमी केल्याने पातूर वनपरीक्षेत्रातील वनकामगारांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर उपाेषण केले. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या वनकामगारांनी यापूर्वी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव घेतली हाेती. आंदाेलकांच्या मागण्या-व्यथा वेगवेगळ्या असल्या तरी त्यांना नेहमीच न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव का घ्यावी लागते, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. यावर तातडीने दीर्घकालीन ताेडगा काढण्याची मागणी हाेत आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील राजनखेड येथील वनकामगार छाेटू माणिक जाधव, सावन कवरसिंग जाधव, निरंजन नाजूक जाधव, संजय गाेविंद जाधव, राेशण माणिक जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या नविेदनानुसार त्यांचे अकाेला वनविभागाअंतर्गत पातूर बीट संरक्षाचे काम सन 2016-2021पर्यंत सलग प्रत्येकी 240 दिवस भरले. मात्र आम्हाला 2021 पासून पातूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कारण नसताना आणि लेखी न देता आमचे काम बंद केल्याचे वनकामगारांचे म्हणणे आहे. तसेच त्यांना उडावा-उडवीची उत्तरे देण्यात आल्याचाही आराेप उपाेषणकर्त्यांनी केला आहे.
गावात काम मिळेना
आम्ही गरीब असून, आम्हाला गावात मिळत नसल्याचे वनकामगारांनी नविेदनात नमूद केले. याबाबत आम्ही उपवनसंरक्षकांची भेट घेतली. मात्र त्यानंतरही आम्हाला देण्यात आले नाही. त्यामुळे आम्हाला उपाेषणाचा मार्ग पत्करणे भाग पडले. आम्हाला तातडीने काम उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी बार्शीटाकळी तालुक्यातील राजनखेड येथील वनकामगारांनी नविेदनात केली आहे. हे सर्वजण पातूर वनपरिक्षेत्राअंतर्गत काम करीत हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.