आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:दोन बांगलादेशींसह चौघांना अटक‎

अकोला‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खोटे कागदपत्र बनवून पासपोर्ट बनवण्याच्या‎ इराद्यात असलेले दोन बांगलादेशी, दमानिया‎ हॉस्पिटलमधील एक जण व आणखी एकाला‎ अशा चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांना‎ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने‎ पोलिस कोठडी सुनावली आहे.‎ २०१६ मध्ये किडनी तस्करीमध्ये आरोपी‎ असलेल्या देवेंद्र शिरसाट याला फसवणुकीच्या‎ गुन्ह्यामध्ये जुने शहर पोलिसांनी अटक केली‎ होती. त्याची कसून चौकशी केल्यानंतर दमानी‎ हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या वाकपंजर या‎ व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.

या दोघांच्या‎ पोलिस कोठडी दरम्यान आणखी दोन युवकांची‎ नावे समोर आली. ठाकूर यांच्या वाड्यात‎ राहणाऱ्या त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात‎ घेतले. ते दोघे बांगलादेशचे नागरिक असल्याचे‎ चौकशीत समोर आले.

या दोघांनीही‎ सिलिगुडीचे एजंटच्या माध्यमातून आधार कार्ड‎ बनवल्याचे समोर आले. पोलिसांच्या प्राथमिक‎ चौकशीत ते चहापत्तीचा व्यवसाय करत‎ असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तो त्यांचा‎ बनाव होता. या दोघांनी येथून बँकेचे पासबुक‎ सुद्धा काढले आहे. बनावट कागदपत्रांच्या‎ आधारे निवासी पुराव्याचे कागदपत्र बनवणे व‎ त्यानंतर पासपोर्ट काढण्याच्या तयारीत‎ असल्याचे पोलिसांच्या चौकशी समोर आले‎ आहे. जुने शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार‎ सेवानंद वानखडे यांनी याप्रकरणी सखोल‎ चौकशी केली असता आरोपींना अटक केली.

‎ त्यांच्यावर फॉरेन ॲक्टनुसार कारवाई करून‎ रविवारी यातील बांगलादेशी आरोपींना‎ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने‎ त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. या‎ बांगलादेशींचा नेमका इरादा काय होता याची‎ चौकशी पोलिस करत असून, चौकशीअंती खरे‎ काय ते समोर येणार आहे. पोलिस अधीक्षक‎ संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनात जुने शहर पोलिस‎ कारवाई करत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...