आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे बिग स्टाेरी:पाण्याखाली जाणाऱ्या दाेन मीटरच्या‎ पुलासाठी खर्च हाेणार चार कोटी!‎‎

अकाेला‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीग्राम येथील ब्रिटिशकालीन पूल‎ नादुरुस्त झाल्याने नदीपात्रातून तात्पुरत्या‎ स्वरुपाचा पर्यायी मार्ग तयार करण्यात येत‎ आहे. या मार्गावर नदीपात्रातील‎ पाण्यापासून केवळ २ मीटर उंचीचा पूल‎ तयार हाेत आहे.‎ वास्तविक सुमारे १० मीटर उंचीच्या‎ ब्रिटिशकालीन पूलावरूनच ६ मीटरपर्यंत‎ पुराचे पाणी वाहत असल्याने हा पूल‎ वाहतुकीसाठी बंद असताे.

पूर‎ आेसरल्यानंतरही नदीपात्रात प्रचंड पाणी‎ असते. त्यामुळे हा तात्परता मार्ग पुरात‎ वाहून न गेल्यासही या पर्यायी मार्गाचा‎ वापर वर्षभरात ६ महिन्यांपेक्षा जास्त‎ काळ हाेणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत‎ आहे. या तात्पुरत्या कामासाठी ४ काेटी‎ रुपये मंजूर करण्यात आले असून,‎ आतापर्यंत १ काेटी ९९ लाखांचे देयकही‎ अदा करण्यात आले आहे.‎ ब्रिटिशकालीन पूल नादुरुस्त असल्याने‎ १८ आॅक्टाेबर २०२२ राेजी वाहतुकीसाठी‎ बंद केला. त्यामुळे ग्रामस्थ व सर्वपक्षीय‎ संघर्ष समितीने धरणे आंदाेलन केले.‎ अखेर नदीपात्रातून तात्पुरत्या स्वरुपाचा‎ पर्यायी मार्ग तयार करण्यासाठी भारतीय‎ राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून‎ डिसेंबरमध्ये काम सुरू केले.
‎ ‎ ‎ ‎ ‎
पुलावरुन सुरू आहे‎ जीवघेणी वाहतूक‎
मार्गाचे खाेदकाम सुरू असून, चढ व‎ उतार आहे. त्यामुळे चालकांना अतिशय‎ सावध राहूनच वाहन चालवावे लागते.‎ रुग्ण किंवा लहान बाळाला कडेवर‎ घेऊन महिलेला दुचाकीवर बसून प्रवास‎ करणे अतिशय धाेकादायक आहे.‎ वृद्धांना दुचाकीवरून बसून प्रवास‎ करताना सावधानता बाळगावी लागत‎ आहे.‎ ‎या पर्यायी मार्गाचा वापर वर्षभरात ६‎ महिन्यांपेक्षा जास्त काळ हाेणार नाही.

बातम्या आणखी आहेत...