आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आरटीपीसीआर:जिल्ह्यात कोरोनाचे चार नवे रुग्ण; एकाला सुटी ; ‘आरटीपीसीआर’चे 103 अहवाल झाले प्राप्त

अकोला12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात रविवारी, १९ जूनला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणी आरटीपीसीआरचे १०३ अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या १२ दिवसांपासून जिल्ह्यात सलग कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने चाचण्या वाढविल्या आहेत. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने घेऊन चाचण्या करण्यात येत आहेत. रविवारी आरटीपीसीआरचे १०३ अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये चार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

रुग्णांमध्ये एक महिला व तीन पुरुषांचा समावेश असून, एक रुग्ण मूर्तिजापूर तर तीन अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. आहे. गृहविलगीकरणातून एकास डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या ६५,२१६ झाली आहे.

देशात इतरत्र कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने संभाव्य चौथ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत अकोला येथील सर्वोपचार रुग्णालय व मूर्तिजापुरातील शासकीय रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने सद्यःस्थितीत पुरेशी व्यवस्था तयार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...