आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटेत अडचणी:शिक्षक नसल्याने पालक, ग्रामस्थ, लाेकप्रतिनिधींचे शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु. येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नसल्याने पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, लाेकप्रतिनिधींनी साेमवारी दुपारी जिल्हा परिषदेत धाव घेत शिक्षणाधिकाऱ्यांच्या (प्राथमिक) कक्षात ठिय्या आंदाेलन केले. शिक्षकांच्या नियुक्तीसाठी अनेकदा जि. प. प्रशासनाशी पत्रव्यवहार केल्यानंतरही ताेडगा निघाला नाही. त्यामुळे ग्रामस्थांवर आंदाेलनाची वेळ आली आहे.

शासन सामाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या संधी समानतेने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी काेट्यवधी रुपये खर्च करते. वेतन, अनुदान, पाठ्यपुस्तके, भाैतिक सुविधा, पाेषण आहारासह इतरही बाबींवर निधी खर्च करण्यात येते. मात्र तरीही जि. प. चा शैक्षणिक दर्जा का‌ॅंन्व्हेंटच्या तुलनेने अगदी सुमार आहे. याला शिक्षकांना शिक्षणबाह्य कामे देणे, रिक्तपदांसह अन्य बाबीही जबाबदार आहेत.

दरम्यान अडगाव बु. येथे शिक्षक नसल्याने 19 डिसेंबर राेजी ग्रामस्थ व लाेकप्रतिनिधींनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात आंदाेलन केले. त्यांनी शिक्षणाधिकारी डाॅ. वैशाली ठग यांच्याशी चर्चा केली. यावेळी वंचितचे नेते तथा माजी जि. प.सदस्य गाेपाल काेल्हे, सरपंच अशाेक घाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास वानखडे, उपाध्यक्ष विनाेद मानमाेठे, माणिक घाटे, शामकुमार काेल्हे, दिलीप वानखडे, सुधाकर वानखडे आदी उपस्थित हाेते.

हे आहेत प्रश्न

अडगाव बु. येथील जि.प.शाळेत इयत्ता 9 वी व 10 साठी विज्ञान विषय शिकवण्यासाठी अनेक वर्षांपासून शिक्षकच नाहीत. गणित विषय शिकवणारे शिक्षक 2020 मध्ये सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून हे पद रिक्तच आहे.

इयत्ता 9 वी व 10 वीसाठी एकच शिक्षक कार्यरत आहे. गत दाेन वर्षांपासून इयत्ता 11 वी व 12 वीसाठी एकच शिक्षक कार्यरत आहे. या वर्गासाठी मराठी व इतिहास विषय शिवकण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नाही.

असा केला पाठपुरावा

शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक लाेकप्रतिनिधी,ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र केवळ आश्वासनच िमिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परिणामी त्यांनी साेमवारी आक्रमक पवित्रा घेत शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्याच दिला.

हे दिले आश्वासन

शिक्षकांच्या नियुक्तीबाबत ताेडगा निघाल्याशिवाय हटणार नसल्याचा पवित्रा लाेकप्रतिनिधींनी घेतला. अखेर संध्याकाळी तीन शिक्षकांची तात्पुत्या स्वरुपात आणि दाेन प्राथमिक शिक्षकांची िनयुक्ती करण्याची ग्वाही शिक्षणि विभागातर्फे देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...