आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा नगरसेविका असताना दिवंगत अॅड. धनश्री देव अभ्यंकर या दरवर्षी जागतिक महिला दिनी ८ मार्च रोजी महिलांचा सत्कार तसेच महिलांसाठी नि:शुल्क आरोग्य शिबिर आयोजित करत होत्या. त्यांच्या निधनानंतर निलेश देव मित्र मंडळाने त्यांनी सुरू केलेले उपक्रम कायम सुरू ठेवले आहेत. यंदा सुद्धा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून निःशुल्क आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनानिमित्त जठारपेठ, न्यू तापडिया नगर, रामदास पेठ, निबंधे प्लाॅट, उमरी परिसरातील सुमारे ४०० महिलांनी आरोग्य तपासणी महाआरोग्य शिबिरात करण्यात आली. त्याच बरोबर विविध कार्यक्रमाचे आयोजन या निमित्त करण्यात आले. पॅथॉलॉजी चाचण्या देखील यावेळी करण्यात आल्या. नि:शुल्क आरोग्य महाशिबिराच्या उदघाटक म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, प्रमुख पाहुण्या म्हणून पुष्पा इंगळे यांची उपस्थिती होत्या.
यावेळी विविध डॉक्टर्स महिलांच्या आरोग्य शिबिरात उपस्थित राहतील. दंतरोग तज्ञ डॉ. आर. बी. हेडा, शल्य चिकित्सक प्रसूती व स्त्री रोग तज्ञ डॉ. तुलिका सिन्हा, बालरोग व नवजात शिशू तज्ज्ञ डॉ. कल्याणी महल्ले, बालरोग व नवजात शिशू तज्ज्ञ डॉ. मदन महल्ले, हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉ. निखिल लहाने, लॅप्रोस्कोपीत व एन्डोस्कॉपी सर्जन डॉ. संदिप इंगळे, अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रणय महल्ले, डॉ. निखिल बोर्डे, त्वचा रोग व सौंदर्य तज्ञ डॉ. सुमेध खंडारे आदींची उपस्थिती होती. उपस्थित डाॅक्टरांनी महिला व लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करत औषधे व इतर आवश्यक सूचना केल्या. ब्लड शुगर, फास्टिंग पोस्टिंग टेस्ट, डॉ. हेडगेवार रुग्णालय व अनुसंधान केंद्र अकोला व निलेश देव मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उपाशी पोटी व जेवणानंतर दीड तासाने करण्यात आली. त्याच बरोबर जठार पेठमधील स्वीट मार्ट व उपाहारगृह यांना ओला व सुखा कचरा वर्गीकरणाकरिता डस्टबिन वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे प्रशांत राजुरकर, पूर्व झोन क्षेत्रीय अधिकारी व कर अधीक्षक विजय पारतवार यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी जठार पेठ भागात डस्ट बिन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प, तसेच अॅड. धनश्री देव रुग्ण कल्याण उपकरण बँक तसेच निलेश देव मित्र मंडळातर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन दिलीप देशपांडे यांनी केले. यावेळी निलेश देव, जयंतराव सरदेशपांडे, शैलेश देव, रश्मी देव, मोहन काजळे, मिनाश्री आपोतीकर, महेश जोशी, शंकरराव इंगळे, भास्करराव बैतवार, रामहरी डांगे, राम उमरेकर, विजय वाघ, शशिकांत हिवरखेडकर, प्रकाश जोशी, राजू कनोजिया, वंदना वासनिक, मनोहर बनसोड, राजू गुल्लनवार, कैलास तिरपुडे,शेगावकर गुरुजी, विशाखा गुल्लनवार, समिश्रा गुल्लनवार, सुधीर मस्के, बबलु तिवारी, रविंद्र मेश्राम आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.