आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षणाचे विनामुल्य आयोजन:निराधार महिलांसाठी विनामुल्य स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिर

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने निराधार महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे विनामुल्य आयोजन केले आहे. स्वामिनी विधवा विकास मंडळ, सेंट-ग्रामिण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेणार आहे. प्रशिक्षणाला १२ आॅगस्ट पर्यंत प्रवेश निश्चितीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत किंवा स्वामिनी संघटना कार्यालय, स्वामिनी चौक, जवाहर नगर रोड, रणपिसे नगर, अकोला येथे संपर्क करावा, असे कळवण्यात आले आहे.

विधवा, घटस्फोटीत परितक्त्या अशा निराधार महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देणार आहे. स्वयंरोजगाराचे तज्ञ प्रशिक्षकांमार्फत मोफत प्रशिक्षण देणार आहे. हा उपक्रम हा १८ ते ४५ वयोगटातील निराधार महिलांसाठी असून सातवी पास असणे आवश्यक आहे. इच्छूक महिलांना सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत वित्तपुरवठा करणार आहे. बीपीएल राशन कार्ड धारक महिलांनी दहा ते पाच या वेळेत प्रशिक्षण घ्यायचे आहे. २५-३० निराधार महिलांचा गट असणाऱ्या गावात प्रशिक्षक देता येणार आहेत. किमान सहा ते कमाल दहा दिवस अशी बॅच असणाऱ्या प्रशिक्षणाला १२ आॅगस्ट पर्यंत प्रवेश निश्चितीसाठी सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखेत किंवा स्वामिनी संघटना कार्यालय, स्वामिनी चौक, जवाहर नगर रोड, रणपिसे नगर, अकोला येथे संपर्क करावा. असे आवाहन जिल्हाध्यक्षा साधना पाटील व आरएसईटीआयचे संचालक मनोज मेहेर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...