आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-रेवा विशेष गाडीच्या कालावधीत वाढ:उत्सव काळात आरक्षण फुल्ल; आतापासून नवरात्र, दिवाळीसाठी वेटिंग

अकोला19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई ते रेवा दरम्यान धावणाऱ्या फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. गणपती उत्सव काळात रेल्वेचे आरक्षण फुल होते. सध्या नवरात्र आणि दिवाळी दरम्यानचे आरक्षण फुल दिसून येत आहे. मुंबई, पुणे मार्गावरील एक्सप्रेस गाड्यांना 15 ते 20 दिवसांचे वेटिंग आहे.

मुंबई-रेवा स्पेशलमध्ये वाढ

02188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - रेवा 30 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी चालवण्‍यासाठी अधिसूचित केलेले विशेष, आता 28 ऑक्टोबरपर्यंत चालवण्‍यासाठी वाढवण्यात आले आहे. तसेच 02187 रेवा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल जी 29 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक गुरुवारी धावण्यासाठी अधिसूचित करण्यात आली आहे, ती आता 27 ऑक्टोबरपर्यंत धावेल. या गाड्यांच्या धावण्याचे दिवस, वेळा, थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नाही.

एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण फुल

श्रावण महिन्यांपासून उत्सवांना सुरुवात होते. गणपती, नवरात्र, दिवाळीपर्यंत रेल्वे प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ होते. त्यात यंदा पुणे, मुंबई मार्गावरील अनेक गाड्या रेल्वेच्या विविध कामासाठी रद्द करण्यात आल्या. यामुळे सध्या सुरु असलेल्या गाड्यांमध्ये पंधरा ते वीस दिवसांचे वेटिंग बघावयास मिळते आहे. तेसच नवरात्र आणि दिवाळी दरम्यानच्या तारखांमध्येही महिन्याभऱ्याचे वेटिंग आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

उत्सव काळात गाड्यांची मागणी

सध्या मध्य रेल्वे प्रशासन मंडळाच्या अनेक गाड्या दुरुस्तीच्या कामामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या पूर्ववत करण्यात याव्या, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे. गाड्या बंद असल्यामुळे नोकरदार आणि विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यंदा कोरोनाच्या दोन वर्षानंतर नवरात्र आणि दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे. परिणामी आतापासून गाड्यांना वेटिंग आहे. मुंबई, पुणे, कोलकत्ता, सुरत मार्गावरील गाड्या प्रचंड फुल आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून दिवाळी, नवरात्र उत्सव काळात विशेष ट्रेन सोडण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...