आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकहिताचे उपक्रम:गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अंतर्गत गाडेगाव ग्रा.पं.ला मिळाले ३ लाखांचे बक्षीस

तेल्हारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत राबवल्या गेलेल्या योजनेत तेल्हारा तालुक्यातील ग्रामपंचायत गाडेगावला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले आहे. तर तेल्हारा तालुक्यातील ग्राम सदरपूरने प्रथम क्रमांक मिळवला. तेल्हारा तालुक्यातील गाडेगावचे सरपंच प्रमोद वाकोडे हे ग्रा. पं.च्या माध्यमातून लोकहिताचे उपक्रम आणि योजना राबवत आहेत. त्यापैकी शासनाच्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या अंतर्गत १ मे ते १५ जून २०२२ दरम्यान लोकसहभागातून त्यांनी तालुक्यातून दुसऱ्या क्रमांकावर आपल्या ग्रा. पं.च्या वतीने गाळाचा उपसा केला. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी त्यांना ३ लाखांचा धनादेश दिला. या वेळी गाडेगावचे सरपंच प्रमोद वाकोडे आणि ग्रामसेविका वनमाला करवते यांनी संयुक्तपणे धनादेश स्वीकारला.

बातम्या आणखी आहेत...