आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतमालासह जनरेटरची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात रविवारी स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. पोलिसांनी हरभरा, तूर, गव्हासह एकूण ९ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. हे चोरीचे गुन्हे जल्ह्यातील बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी तालुक्यात घडले होते. एकूण १२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. शेतातून धान्य व अन्य साहित्य चोरी गेल्याच्या घटना अनेकदा उघडकीस येतात. आधीच नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झालेले असतानाच चोरीच्या घटनांमुळे आणखी आर्थिक संकटात सापडतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालावर डल्ला मारणाऱ्या टोळीचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने पातूर तालुक्यातील शिर्ला येथील गौतम उर्फ मुन्ना दिलीप इंगळे (वय ३८) याची चौकशी केली. त्याने प्रथम उडवा- उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी त्यांची पुन्हा बारकाईने चौकशी केल्यानंतर चोरीच्या गुन्हयांची उकल झाली. त्याला साथीदार करणा देवानंतर गवई (वय २८, रा. शिर्ला) यांचाही मदत झाली. त्यांनी शेतमाल, रसवंतीची मशीन व अन्य साहित्याची चोरी गेली. पोलिसांनी चौकशीअंती मुद्देमालही जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी श्रीधर , अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुकुंद देशमुख, एएसआय नितीन ठाकरे,हेड कॉन्स्टेबल दत्ता ढोरे, विशाल मोरे, श्रीकांत पातोंड, संदीप ताले, रवी पालीवार, सुमित राठोड, चालक अक्षय बोबडे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.