आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआषाढी एकादशीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो दिंड्या विठु माऊलीच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. यामध्ये विदर्भातुन सर्वात मोठी दिंडी श्री संत गजानन महाराज संस्थानची असल्याचा नावलौकिक आहे. आज शेगावहून ही पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे. पालखी निघण्यापूर्वी सोमवारी सकाळी सहा वाजता महाआरती करण्यात आली. भाविकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. यावेळी 'गण गण गणात बोते' नामस्मरणाने परिसर भक्तिमय झाला.
पालखीचा प्रवास
श्री क्षेत्र पंढरपूरला संतांच्या पालख्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून जातात. १९९८ पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारीची परंपरा सुरु आहे. यावर्षी पालखीचे हे ५३ वे वर्ष आहे. श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत ७२५ किलोमीटर आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते शेगावपर्यंत परतीचा प्रवास हा ५५० किलोमीटर आहे. असा एकूण प्रवास १२७४ किलोमीटरचा पालखीचा प्रवास आहे.
विशेष कारागिरांनी तयार केली पालखी
शेगाव संस्थानने श्री गजानन महाराजांची चांदीची पालखी बनारस येथील कारागिरांकडून तयार करवून घेतली आहे. त्यावरील आकर्षक नक्षीकाम कलाकुसरीने परिपूर्ण आहे.
पालखीचे व्यवस्थापन
श्रींचे पालखी सोबत असलेल्या वारकरी मंडळींना ठिकठिकाणी चहापानी व अल्पोपहाराची व्यवस्था केलेली राहते. तसेच श्रींच्या पालखीचे गावातील नागरीकांकडून मनोभावे श्री महाराजांना शाल, श्रीफळ वाहून स्वागत केल्या जाते. श्रींच्या पालखीसोबत प्रवास करताना वारकऱ्यांची दुपारी व रात्री भोजन प्रसादाची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे वाटेने चहापाणी व फराळाची व्यवस्था सुध्दा श्रींच्या भक्तांकडून केल्या जाते. रात्रीच्या मुक्कामी निवासाची व्यवस्था धर्मशाळा, मंगल कार्यालय व शाळा यामध्ये केलेली असते. दिंडीतील वारकरी मंडळींना आवश्यकतेनुसार औषध, इंजेक्शन, सलाईन देवून सेवार्थ औषधोपचार करण्यात येतो. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याकरीता टँकरची व्यवस्था करण्यात येते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.