आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजानन महाराजांच्या पालखीचा मार्ग निश्चित:शेगावमधून पंढरपूरसाठी पालखी उद्या प्रस्थान ठेवणार; 8 आणि 9 जूनला अकोल्यात मुक्कामी

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गजानन महाराज संस्थानची 'श्रीं'ची पालखी पंढरपूर वारीसाठी भजनी दिंडी, हत्ती आणि घोड्यांसह 6 जूनला सकाळी 7 वाजता निघणार आहे. ही पालखी 8 व 9 जून रोजी अकोल्यामध्ये मुक्काम करणार आहे. यंदा पालखीच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या दोन वर्षाच्या खंडानंतर श्रीच्या पालखीच्या दर्शनाचे वेध अकोलेकरांना लागले आहे. ठिकठिकाणी माऊलीच्या पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील सुरू असलेले रस्त्याचे बांधकाम यामुळे यंदा पालखीच्या मार्गात बदल झाले आहे. रविवारी दुपारी प्रशासनाकडून हा मार्ग जाहीर करण्यात आला. दरम्यानच्या काळात या मार्गावरील वाहतून अन्यत्र वळविण्यात आली आहे.

असा राहिल बुधवारचा मार्ग

भौरद येथून अकोला येथे पालखी बुधवारी दाखल होईल. 8 जून रोजी खंडेलवाल विद्यालय, गोडबोले प्लॉट, गजानन चौक, श्रीवास्तव चौक, विठ्ठल मंदिर, काळा मारोती, लोखंडी पूल, मोठे राम मंदिर, सावताराम मिल समोरून मंगलदार मार्केट, अकोला स्टॅन्ड, संतोषी माता मंदिर, दामले चौक, जुना वाशिम स्टॅन्ड, चांदेकर चौक, कालंका माता मंदिर, स्वावलंबी विद्यालय समोरून मुंगीलाल बजोरीया विद्यालय येथे मुक्काम.

गुरुवारचा पालखीचा मार्ग

मुंगीलाल बजोरिया विद्यालय समोरून पालखी निघून पोस्ट ऑफीस, धिंग्रा चौक, टॉवर चौक, रतनलाल प्लॉट चौक, नेहरू पार्क चौक, हुतात्मा चौक, इन्कमटॅक्स चौक, हिंदू ज्ञानवीठ विद्यालय, आदर्श कॉलनी, बोबडे दूध डेअरी, सिंधी कॅम्प, जेल चौक, अशोक वाटिका, सरकारी बगीचा, सिटी कोतवाली चौक, जयहिंद चौक, हरिहर पेठ, शिवाजी हाऊन हायस्कूल पर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

सोमवारी शेगावमधून प्रस्थान

सोमवारी (ता. सहा) सकाळी 7 वाजता शेगाव येथील श्री मंदिरातून पालखीचे प्रस्थान होईल. 6 जून रोजी श्री क्षेत्र नागझरी येथे आगमन व पारस येथे मुक्काम, 7 जून रोजी गायगांव येथे आगमन व भौरद येथे मुक्काम, 8 जून रोजी अकोला येथे आगमन व मुंगीलाल बजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात मुक्काम, 9 जून रोजी जुने शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात मुक्काम, 10 जून रोजी भरतपूर येथे आगमन व वाडेगाव येथे मुक्काम, त्यानंतर विविध शहरांमध्ये मुक्काम करून पालखी 8 जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहचेल.

बातम्या आणखी आहेत...