आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:महिला महाविद्यालयात गणेश मूर्ती कार्यशाळा

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयामध्ये पर्यावरण पुरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.कार्यशाळेच्या सुरुवातीला मार्गदर्शक डॉ. ज्ञानसागर भोकरे यांनी पर्यावरणाचे रक्षण किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. त्यांनी विद्यार्थिनींना अत्यंत सोप्या पद्धतीने शाडू माती पासून गणपती मूर्ती बनवणे शिकवले. यावेळी प्राचार्य डॉ. चारुशीला रुमाले यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून मार्गदर्शन केले, कार्यशाळेमध्ये विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

यावेळी प्रा. राधा सावजीयानी, प्रा. डॉ. शालिनी बंग प्रा. अनुप शर्मा, प्रा. स्वप्निल इंगोले, प्रा. विद्या धॄव, प्रा. डॉ. विनोद खैरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. डॉ. आशिष मुठे व प्रा. स्मिता देवर यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले, अशी माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...