आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक उपक्रम:मूकबधिर विद्यार्थ्यांकडून गणेश स्थापना; दररोज एकत्र कुटुंबीयांकडून पूजा-अर्चा

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कम्युनिटी टु टिबी पेशन्ट उपक्रमा अंतर्गत दहा टिबी रुग्ण एक वर्षासाठी दत्तक घेणाऱ्या विप्र युवा वाहिनी गणेशोत्सव मंडळाने इतर मंडळांपुढे आदर्श निर्माण केला असताना गणेशाची स्थापना मुकबधीर विद्यार्थ्यांकडून तर दररोज शहरात एकत्र कुटुंब पद्धतीने राहणाऱ्या कुटुंबीयांकडून पुजा-अर्चनाही केली जाते. त्याच बरोबर अवयवदाना बाबत जनजागृतीचे कार्य या गणेशोत्सव मंडळाकडून केले जात आहे. त्यामुळे या मंडळाने आपला आगळ्या-वेगळ्या कामाचा ठसा निर्माण केला आहे.

लोकमान्य टिळकांनी इंग्रजांनी भारतीयांना एकत्र येण्याबाबत बंधने घातल्या नंतर सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेश मंडळांच्या माध्यमातून नागरिक एकत्र येत, यातुन देशभक्तीचे कार्य चाले. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर मात्र गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात बदल झाले. सद्यस्थितीत तर गणेशोत्सवाचे वेगळेच रुप घेतले आहे. मात्र काही मंडळे गणेशोत्सवातून सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेवून सामाजिक दायित्व निभावण्याचा प्रयत्न करीत आहे. यापैकी एक नाव म्हणजे विप्र युवा वाहिनी गणेशोत्सव मंडळ. सहावे वर्ष असलेल्या या मंडळाने मंडळाने शासनाच्या मोहिमेला प्रतिसाद देत दहा क्षयरोगी रुग्णांना वर्षभरासाठी दत्तक घेवून त्यांना सकस आहार पुरविण्याची जबाबदारी उचलली आहे. मंडळाच्या या वेगळ्या निर्णयाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन व स्वागत केले आहे. केवळ क्षयरुग्ण दत्तक घेवूनच या मंडळाचे कार्य थांबलेले नाही.

तर दरवर्षी गणेशाची स्थापना शहरातील मुकबधीर विद्यार्थ्यांच्या हातून केली जाते. त्यांच्या हस्ते पुजा-अर्चना करुन त्यांना एका हॉटेल मध्ये त्यांच्या मनाप्रमाणे भोजनाचा आनंदही दिला जातो. याच बरोबर ऱ्हास पावत चाललेली एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व सर्व सामान्यांना कळावे, आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, या हेतून गणेशोत्सवात दहा दिवस सायंकाळी एकत्र कुटुंब पद्धतीने राहणाऱ्या कुटुंबियांकडून पुजा करुन त्यांचा सत्कार केला जातो. मोफत रक्तदाब आणि मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजनही केले जाते. या कामात मंडळाचे डॉ.मनीष शर्मा,मंडळाचे अध्‍यक्ष सुमित शर्मा, अॅड.सौरभ शर्मा, अॅड.गिरीराज जोशी, विदूर शर्मा, गोपाल शर्मा, अखिल व्यास आदींसह कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...