आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Ganesh Mandal, Which Creates Public Awareness For De addiction; Initiative Of Maa Chandika Ganeshotsav Mandal At Kurankhed In Social Work| Marathi News

दिव्य मराठी विशेष:व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करणारे गणेश मंडळ; सामाजिक कार्यात कुरणखेड येथील माँ चंडिका गणेशोत्सव मंडळाचा पुढाकार

कुरणखेड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माँ चंडिका युवा प्रतिष्ठान गणेश उत्सव (बाल गोपाल) मंडळ यांनी सामाजिक प्रगतीच्या उद्देशातून शिक्षण, व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या प्रयत्नाने परिसरात शिक्षण व व्यसनमुक्तीसाठी महत्त्वाचा हातभार लागला आहे.मंडळाची स्थापना जवळपास ६१ वर्षांपूर्वी करण्यात आली. तेव्हापासून उत्सवाची परंपरा अखंडित सुरू आहे. कुरणखेड येथील वाॅर्ड क्र. २ मध्ये जुन्या चावडी परिसरात या मंडळाची मूर्ती स्थापन केली जाते. वर्षभर धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मंडळातर्फे आयोजित करण्यात येतात. मंडळातर्फे गावात सुसज्ज अभ्यासिका, व्यसनमुक्तीपासून दूर राहण्यासाठी तरुणांमध्ये जनजागृती, विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना बक्षीस सुद्धा वितरित करण्यात येते.

तरुण वर्ग शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहावा, यासाठी मंडळाची व्यायाम शाळा सुद्धा कार्यरत आहे.समाजाच्या प्रत्येक घटकांसाठी मंडळाचे कार्यकर्ते समाज हिताचे व समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतात यावर्षी मंडळातर्फे लालबागच्या राजाची मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. यावर्षी मंडळामध्ये अमर मालाणी, मंगेश पावडे, अमोल इंगळे, मुकेश हरसुलकर, योगेश विजयकर, शेखर भदे, मयुर धानोरकर, गणेश धानोरकर, अनंता धनोरकर, गोपाल धानोरकर, रीतेश भेंडकर, प्रवीण सोनोने, निखिलेश विजयकर, तेजस विजयकर, अंकुश मालवे, प्रथम बरडे,ओम ढोकणे, उज्वल कांबे, यांच्यासह अनेक सदस्यांचा सहभाग आहे.

पूरग्रस्तांसाठी सेवा
मंडळातील सदस्य माँ चंडिका आपत्कालीन बचाव पथकात कार्यरत आहेत. मंडाळाचे अध्यक्ष योगेश विजयकर, उपाध्यक्ष शेखर भदे, मंगेश पावडे, प्रज्वल कांबे, उज्वल कांबे यांनी चिपळूण येथे जाऊन पूरग्रस्तांची मदत केली होती.
अमर मालाणी, ज्येष्ठ सदस्य.

मंडळ सदैव तत्पर
नागरिकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाण्यासाठी मंडळ सदैव तत्पर असते. अपघातग्रस्तांना मदत, आपत्ती व्यवस्थापनात आमचे मंडळ अग्रेसर आहे.
योगेश विजयकर

बातम्या आणखी आहेत...