आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणपूरक:शाडू मातीप्रमाणेच पंचगव्यापासूनही गणेश मूर्तींची निर्मिती ; कागदाच्या  मूर्तीला अधिक मागणी

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणरायांच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत. लाडक्या बाप्पाच्या मूर्ती घडवण्याचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. मागील काही वर्षांत पीओपीच्या मूर्तींना पर्याय म्हणून शाडू मातीच्या मूर्तीं उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे भक्तांची पर्यावरणपूरक मूर्तींची मागणीही वाढली आहे. शाडूच्या मातीच्या मूर्ती, कागदाच्या लगद्यापासून बनवल्या जाणाऱ्या गणेश मूर्तींकडे भक्ताचा ओढा वाढला आहे. यावर्षी अकोल्यात पंचगव्यापासून तयार मूर्तीही उपलब्ध झाल्या आहेत.

अकोल्यात आदर्श गोसेवा एवं अनुसंधान प्रकल्प, तसेच अन्य गोसेवा संस्थांकडून गोमय गणेश मूर्ती विक्रिसाठी विविध दुकानांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. गोमया पासून निर्मित या पर्यावरणपूरक मूर्ती आहेत. ७ ते ९ इंचपर्यंत मूर्तींचा आकार आहे. २५० ते ३५० रूपये त्याची किंमत आहे. या मूर्ती वजनाने अतिशय हलक्या पण दिसायला तेवढ्याच देखण्या आहेत.

अकोल्यातील पर्यावरणप्रेमी मूर्तिकार अनेक वर्षापासून शाडू मातीपासून गणेश मूर्ती साकारण्याचे काम करीत आहेत. मुख्य म्हणजे भक्तांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे त्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना अकोल्यातच नाही, तर इतर शहरांतूनही मागणी वाढत आहे. अकोल्यात तयार झालेल्या आकर्षक आणि सुबक मूर्ती बंगळूरू आणि थेट दुबईपर्यंत पोहाेचल्या आहेत. दरवर्षी गणेश भक्त बाहेर राज्यातूनही फोन करून मूर्तिकारांकडे मूर्तीची नाेंदणी करतात.

शाडूची माती आणि वजनाने अतिशय हलका असणारा कागदाचा लगदा वापरून तयार केलेल्याही मूर्ती आहेत. या मूर्ती वजनाला हलक्या आणि सुबक आहेत. या मूर्तींसाठी वापरण्यात येणारे रंगदेखील पर्यावरण पूरक आहेत. पर्यावरणपूरक मूर्तींना भाविकांकडून प्रचंड मागणी असते, त्यामुळे मूर्तीसाठी १ महिन्यांपासूनच नाेंदणी सुरू झाल्याचे स्थानिक मूर्तिकार शरद कोकाटे सांगतात.

सजावटीनुसार ठरते मूर्तीची किंमत
पर्यावरण पूरक मूर्तीच्या किंमती सजावटीनुसार आहेत. कुंदन, मुकुट, सिंहासन, पोषाख यांच्यावर करण्यात येणाऱ्या कलाकुसरीच्या कामानुसार मूर्तीच्या किंमती ठरतात. यावर्षी बाजारात ८ इंच उंचीपासून अडीचफूट उंचीच्या शाडूच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पंचगव्यापासून तयार करण्यात आलेल्या मूर्तीची किंमत २५० रूपयापासून आहे.

बातम्या आणखी आहेत...