आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात लाडक्या बाप्पाच्या नैवद्यासाठी 35 प्रकारचे मोदक:पायनॅपल, किवी, चॉको चिप्सपासूनही तयार केले मोदक

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लागक्या बाप्पाचे आगमन एका दिवसावर आहे. कोरोनामुक्त उत्सवामुळे सर्वत्र उत्साह आहे. सार्वजनिक गणेश मंडळ सज्ज झाली आहेत. तर घरोघरी सजावटीला सुरुवात झाली आहे. बाजारामध्ये लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. अशात गणरायाच्या नैवद्यसाठी मिठाईची दुकाने सजली आहे. यात अकोल्यामध्ये एका मिठाईच्या दुकानात तब्बल 35 प्रकारचे मोदक ठेवण्यात आले आहे. लाडक्या बाप्पासाठीचे विविध फ्लेव्हरमधील हे मोदक भक्तांसाठी आकर्षण ठरत आहेत.

पायनॅपल, किवी, चॉको चिप्सपासूनही

उपहार गृहाने एकाच छताखाली 35 प्रकारचे मोदक तयार करून ग्राहकांना या गणपतीत अनोखी भेट दिलीय. या 35 प्रकारच्या मोदकांमध्ये मथुरा मोदक, चॉकलेट मोदक, चॉको चिप्स मोदक, पायनॅपल मोदक, किवी मोदक, खजूर मोदक, गुलकंद मोदक, पान मोदक, डायफ्रूट मोदक, बदाम मोदक, केसर मोदक, रजवाडीसह अन्य मोदकांचा समावेश आहे. अकोला शहरातील सिव्हिल लाइन चौक परिसरात निर्मल उपहार हे मोदक उपलब्ध असून मोदकाला नागरिकांनी मोठी पसंती दिलीय.

आगळा वेगळा प्रयत्न

महाराष्ट्रात गणेशोत्सव सर्वात जास्त आणि उत्साहात साजरा केला जातो. श्री गणेशाचं आगमन ३१ ऑगस्ट रोजी सार्वजनिक मंडळासह घरोघरी होणार आहे. सर्वत्र बाप्पांच्या आगमनाची तयारी जोमाने सुरु असून बाप्पांना भक्त मोदकाचा प्रसाद नक्कीच देतात. सर्वसाधारणत: मोदक नारळ, पूरण वा खव्यापासून बनवितात. मात्र, अकोल्यातील या उपहारगृहाने यंदा बाप्पाला अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्याचे ठरविले. यातूनच त्यांनी एक नव्हे दहा-वीस नव्हे तर एकूण ३५ प्रकारचे मोदक तयार केले आहे.

बाजारात मिठाईमध्ये विविध प्रकार

गणपतीला मोदक प्रिय असतो. सोबतच मोतीचूर लाडू आणि बर्फीचाही नैवद्य दाखविला जातो. त्यामुळे सर्व दुकानांमध्ये लाडू आणि इतर मिष्ठांन्नाचे प्रदार्थ आकर्षक प्रकारे मांडण्यात आले आहेत. ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात यांची खरेदीही केली जात आहे. शहरातील सर्वच मिठाईच्या दुकान्नामध्ये गर्दी दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...