आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातीची-शेणाच्या मूर्तीची स्थापना केल्यास कुंडी व तुळशीचे रोप भेट:निलेश देव मित्र मंडळाचा पुढाकार, माहिती देण्याचे आवाहन

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्सव साजरा करताना पर्यावरणाला हानी पोचु नये, या उद्देशाने पर्यावरण पुरक गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन केले जाते. या अनुषंगानेच जे नागरिक आपल्या घरी मातीची अथवा शेणाच्या मूर्तीची स्थापना करतील, त्या गणेश भक्तांना एक कुंडी व तुळशीचे निलेश देव मित्र मंडळाच्या वतीने सप्रेम भेट दिले जाणार आहे. मात्र या बाबतची माहिती निलेश देव मित्र मंडळापर्यंत पोचवावी लागणार आहे.

गणेश उत्सवात प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या गणपती मुर्तीची स्थापना केली जाते. प्लॉस्टर ऑफ पॅरीसची मूर्ती विरघळत नाही. तसेच नदी, विहिरीतील पाणी दुषित होते. दुषित पाण्यामुळे जलचर प्राण्यांना जीव गमवावा लागतो. त्यामुळेच गेल्या काही वर्षापासून ईको फ्रेंडली गणपतीची स्थापना करण्याबाबत पर्यावरण प्रेमी नागरिकाकंडून जनजागृती केली जात आहे. यात विविध संस्था संघटनानीही पुढाकार घेतला आहे. तर आता निलेश देव मित्र मंडळाने केवळ आवाहनच केले नाही. तर जे नागरिक आपल्या घरी मातीच्या अथवा शेणाच्या मूर्तीची स्थापना करतील, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुंडी व तुळशीचे रोप भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

येथे करा संपर्क

गणेश भक्तांनी पर्यावरण पुरक श्रींची मूर्ती स्थापन करून जलप्रदूषण कमी करण्यासाठी खारीचा वाटा उचलुन या मोहिमेत सहभागी व्हावे. आपल्याकडील श्रींची मातीची, शेणाची बसवल्यास निलेश देव मित्र मंडळाच्या वतीने आपणास श्रींच्या मूर्तीच्या विसर्जना करीता कुंडी व तुळशीचे रोप देण्यात येणार आहे. दिलेल्या कुंडीत गणपती मूर्तीचे विसर्जन करून त्याच मातीत तुळशीचे रोप लावावे. जणे करुन आपल्या निवासस्थान परिसरात अधिकचा ऑक्सिजन पुरवठा होईल. यासाठी आपल्या घरी श्रींची मूर्ती शेणाची, शाडू मातीची असल्याची माहिती निलेश देव मित्र मंडळ जठारपेठ येथे माहिती द्यावी अथवा 7798880355 या मोबाईल क्रमाकांवर संपर्क साधावा तसेच आपल्याला मातीची अथवा शेणाची गणेश मूर्ती हवी असल्यास त्यासाठीही संपर्क साधावा, असे आवाहन निलेश देव मित्र मंडळाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...