आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्ध परंपरा:पौराणिक दे‌खावे साकारणारे गणेशोत्सव मंडळ ; नवदाम्पत्यांकडून हाेते बाप्पांची आरती

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धार्मिक उत्सव, गणेशाेत्सवाची समृद्ध परंपरा असलेल्या जुने शहरातील श्री काळा मारोती मित्र समाज गणेशोत्सव मंडळातर्फे पाैराणिक देखावे साकारण्यात येतात. ९९ वर्ष झालेल्या मंडळाने यंदा द्राेणाचार्य व एकलव्य या गुरु-शिष्यांवर, संत गजानन महाराज पालखी अर्थात वारीचा देखावा साकारला आहे. पुढील वर्षी मंडळ शताब्दीत प्रवेश करणार असून, शतक महोत्सवी वर्षात सुवर्ण मंदिर व धार्मिक देखावा साकारण्याचा संकल्प केला आहे.

जुने शहरात काळा माराेती मंदिर असून, १९२४ मध्ये भंवरलाल राठी, सावरकर बंधू, गंपू नाना, महादेवराव घाटोळे, अॅड. चिने , किशोर मुजुमदार, रामभाऊ इलामे यांनी पुढाकार घेत श्री काळा मारोती मित्र समाज गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. त्यानंतर भक्तांना पावणारा गणराया अशी श्रद्धा निर्माण झाली. नवदाम्यात्याकडून गणरायाची आरती करण्यात येते. गणेशाेत्सवात ऐतिहासिक, रामायण, महाभारतातील पैराणिक देखावे साकारण्यात येत आहेत. यासाठी छाेटे पुतळे, फ्लेक्स तयार करण्यात येतात. यातून पौराणिक घटना उभी करण्याचा प्रयत्न असताे. देखावे पाहण्यासाठी आिण बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक भागातून भक्त तेथे येत असतात. दरवर्षी गणेशाेत्सवात अखेरचे तीन-चार दिवस तर भक्तांची प्रचंड गर्दी हाेत असते. सध्या मंडळाची धुरा गिरिराज राठी (राठी पेढेवाले), आनंद उगले, शांतीलाल खंडेलवाल, अशोक हातेकर ,प्रसाद जोगळेकर, चैतन्य किर्तीवार, मनोज साहू, वैभव मोरे, विक्की ठाकूर आदींच्या खांद्यावर आहे.

असे साकारले देखावे
श्री काळा मारोती मित्र समाज गणेशोत्सव मंडळातर्फे आतापर्यंत राम-हनुमान, सीता हरण, कृष्ण जन्म ते महाभारत, ज्ञानेश्वर महाराज, संत श्री गजानन महाराज यांच्या जीवनासह अन्य पौराणिक देखावे साकारण्यात आले आहेत. यंदा द्रोणाचार्य व एकलव्य यांचा संवाद आणि गजानन महाराज पालखी देखावा यांचे चलचित्र साकारण्यात आले.

सामाजिक भानही जपले
श्री काळा मारोती मित्र समाज गणेशोत्सव मंडळातर्फे विविध क्रीडा स्पर्धा, नेत्र व आराेग्य तपासणी शिबिर, कलेला वाव मिळण्यासाठी चित्रकला स्पर्धा आयाेजित करण्यात येतात. तसेच ‘आई-वडिलासांसाठी काेणतीही गाेष्ट साेडा; पण काेणत्याही गाेष्टीसाठी आई-वडिलांना साेडू नका’, असे फलक लावत सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न करण्यात येताे.

बातम्या आणखी आहेत...