आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:मुलींवरील सामूहिक अत्याचार; नीलम गोऱ्हेंचे पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील चार ते पाच नराधमांनी १४ व १६ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासंदर्भात कठोर कारवाईचे निर्देश विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिस महासंचालकांना दिले.

शहरातील या अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईच्या संबंधितांना सूचना द्याव्या. या मुलींचे सामाजिक संस्था अथवा पोलिसांच्या साहाय्याने समुपदेशन करण्यात यावे. त्यांना मानसिक आधार देण्यात योग्य ती भूमिका घ्यावी. या मुलींना मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. या आरोपींना जामीन मिळणार नाही, यासाठी आवश्यक कार्यवाही व्हावी, या दोन्ही प्रकरणांचा तपास जलद गतीने व्हावा. या मुलीच्या पालकांशी बोलून त्यांना आवश्यक असेल तर सक्षम वकील देण्यासाठी सहकार्य करावे. या प्रकरणी झालेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात यावा, असे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिस महासंचालकांना दिले.

तीन आराेपींची पाेलिस काेठडीत रवानगी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या तीन आराेपींची शुक्रवार २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. या आराेपींना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. शुक्रवारी १६ डिसेंबर राेजी दुपारी दोन अल्पवयीन मुली आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करून घराकडे निघाल्या होत्या. वाटेत त्यांना एक ओळखीचाच युवक भेटला. ‘मी तुम्हाला घरी सोडून देतो’, असे म्हणत त्याने दुचाकीवर बसवून दोघींनाही सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पवन वाटिकेत नेले. त्यानंतर त्यांना तिथे त्याने चॉकलेट आणि कोल्ड्रिंक्स प्यायला दिले. त्या दोघींनी कोल्ड्रिंक्स पिले आणि चॉकलेट खाल्ले. कोल्ड्रिंक्स प्यायल्यानंतर त्यांना गुंगी यायला लागली. तो युवक त्या दोघींनाही काटेरी झुडुपात घेऊन गेला, अन् त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले हाेते. याप्रकरणी सिव्हिल लाईन्स पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.

बातम्या आणखी आहेत...