आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराेपींची संख्या पाच:मुलींवर सामूहिक अत्याचार; आणखी दोन आरोपींना अटक

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सवि्हिल लाइन्स पोलिस ठाणे हद्दीत न्यू तापडिया नगरात १६ डिसेंबरला दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटकही केली होती. सोमवारी आणखी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली या प्रकरणात आरोपींची संख्या पाच झाली आहे.

१६ डिसेंबरला मैत्रिणीचा वाढदविस आटोपून घरी जाताना १७ वर्षीय मुलगी व तिच्या १४ वर्षीय मैत्रिणीला ऋषीकेश पटके भेटला. त्याने दुचाकीवरून घरी सोडून देण्याची बतावणी करून दोघींनाही पवन वाटिकेत नेले. तेथे त्यांना चॉकलेट, शीतपेय दिले. या शीतपेयात दारू होती. त्यामुळे मुलींना गुंगी आली.

बार असोसिएशनची आज हाेणार बैठक अकोला शहरात अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार ही दुर्देवी घटना आहे. अशी घटना घडायलाच नको. या सामूहिक अत्याचार प्रकरणाबाबत चर्चा करून निर्णय घेण्याकरीता व निषेध करण्याकरीता मंगळवारी २० डिसेंबर रोजी अकोला बार असोसिएशनने तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागून आहे.

बातम्या आणखी आहेत...