आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैधरीत्या विक्री:मूर्तिजापूर येथे 3 लाख रुपयांचा गांजा जप्त; ग्रामीण पोलिस स्टेशनचे

मूर्तिजापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ येथे बुधवारी रात्री गस्त घालत असताना मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी एका कारमधून ३० किलो ओला गांजा जप्त करून एका जणास अटक केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला गुुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याना १ ऑगस्टपर्यंतची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव, पीएसअाय मानकर तसेच हेकॉ. विजय मानकर व पोकाँ. सुदाम धुळगुंडे हे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर २७ जुलैच्या रात्री गस्तीवर होते. रात्री ११ च्या दरम्यान कोहिनूर ढाब्याजवळ दुचाकी व कार यांच्यामध्ये संशयास्पद काहीतरी साहित्याची आदान-प्रदान होत असल्याचे दिसले. त्यांनी आपला मोर्चा या गाड्यांकडे वळवला असता पोलिसांची व्हॅन पाहून दुचाकीवरील दोघे सुसाट पळाले. तर कार चालकाने पळ काढला. परंतु पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला असता त्याने कार कच्च्या मार्गाने शेतात टाकली. यामध्ये कार पलटी होऊन क्षतिग्रस्त झाली.

पोलिसांनी गाडीत लपून बसलेल्या एका जणास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने त्याचे नाव फैजानखान लतिफखान वय २२ रा. मोमीनपुरा ताजनापेठ अकोला असल्याचे सांगितले. तसेच गाडीत गांजा असल्याची माहिती दिली. तपासात गाडीत अवैधरीत्या विक्रीकरिता ठेवलेला गांजा मिळून आला. गोणपाटात पॅक केलेले एकूण सहा पॅकेट ओलसर गांजाचे (कॅनाबीस)आढळून आले.

बातम्या आणखी आहेत...