आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइयत्ता नववीची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांअतर्गत अकरा महिन्यांचा माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू आहे. अकोला, नागपूर व काटोल येथे हा अभ्यासक्रम सुरू असून यामध्ये फळझाडे, फुलझाडे व भाजीपाला पिकाच्या लागवडीपासून ते अभिवृद्धीपर्यंत प्रात्याक्षिक करून घेतल्या जात असून बौद्धिक अभ्यासक्रमही शिकविला जात आहे.
माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी किवा खासगी संस्थेमध्ये नोकरीची संधी असतेच शिवाय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी भांडवलात फुलझाडांची, फळझाडांची रोपे, कलमे, गुलाबाची कलमे, बोन्साय, कॅक्टस, लॉन इत्यादी प्रकारे थोड्या जागेत वाढवून विकण्याच्या व्यवसायही करता येतो.
त्याचप्रमाणे फुलापासून हार, माळा तसेच निरनिराळ्या प्रकारचे पुष्पगुच्छ तयार करून विकण्याचा व्यवसाय करता येतो.
पाच जिल्ह्यांसाठी 100 जागा
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात माळी अभ्यासक्रमासाठी अकोला येथे अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती या जिल्हायासाठी 100 जागा आहेत.
नागपूरमध्ये 100 जागा
कृषी महाविद्यालय महाराज बाग नागपूर येथे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांसाठी 100 जागा व काटोल तसेच अचलपूर येथे 50 जागा आहेत.
प्रवेशासाठी काय हवे?
प्रवेशासाठी नववीची गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याच्या दाखला आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या प्रवेशासाठी जाहिरात साधारणपणे जूनच्या चौथ्या आठवड्यात वर्तमानपत्रात देण्यात येते, असे कृषी विद्यापीठाने कळविले आहे.
येथे मिळणार अर्ज
प्रवेशाचे अर्ज प्रभारी अधिकारी, माळी प्रशिक्षण केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला तसेच कृषी महाविद्यालय नागपूर, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काटोल व कृषी संशोधन केंद्र, अचलपूर येथे मिळतील. प्रवेशाची जाहिरात निघाल्यानंतर हे अर्ज मिळणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.