आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापातूर तालुक्यात शनिवारीही काही िठकाणी गारपीट व पाऊस झाला. त्यामुळे फळबागा व रब्बी हंगामातील पिकांचे दुसऱ्या दिवशीही नुकसान झाले. दरम्यान पातूर व बार्शीटाकळी तालुक्यात शुक्रवारी गारपीट व अवकाळी पावसामुळे फळबाग, रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानाचा अहवाल शनिवारी िजल्हाधिकारी कार्यालयाकडून िवभागीय आयुक्त कार्यालयात पाठवण्यात आला. या पावसामुळे पातूर व बार्शीटाकळी तालुक्यातील ४१९ शेतकऱ्यांचे ५२८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात गत खरीप हंगामात जून ते सप्टेंबर दरम्यान प्रचंड पाऊस झाला हाेता. परिणामी खरीप हंगामातील उत्पादन प्रचंड घटले हाेते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाचाही पिकांना फटका बसला हाेता. खरीप हंगामातील हे नुकसान रब्बी हंगामात भरून काढू, असा िनर्धार करीत शेतकरी कामाला लागले हाेते.
मात्र शुक्रवारी संध्याकाळी बार्शीटाकळी व पातूर तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली हाेती. येथे झाला पाऊस : शनिवारी पातूर तालुक्यात सायंकाळी आलेगाव परिरसात पाऊस झाला. आलेगाव ते डाेंगरगाव मार्गावर गारपीट झाली. पांगरताटी, उमरा, राहेेर अडगाव, उमरवाडी, पिंपळडाेली, नवेगाव, चाेंढी, पांढुर्णा, चिखलवाड, उमरवाडी, पाचरण, दधम, पहाडसिंगी, गावंडगाव या परिसरात पाऊस झाला. रस्त्यावर गाराचा खच साचला हाेता. या पिकांची हानी : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा, भुईमूग, संत्रा, टरबुज, मोसंबी, मूग, पपई पिकांची हानी झाले आहे. शेतात सोंगून ठेवलेला हरभरा व गहू पावसामुळे भिजला आहे. संत्रा, मोसंबी, पपई या फळबागांना वादळी वाऱ्यांचा फटका बसला आहे.
पातूर तालुक्यात शुक्रवारी १६.३ मिमी पाऊस झाला. त्यामुळे २८७ शेतकऱ्यांचे अंदाजे ३७४ हेक्टरवरील पिकांची हानी झाली. बार्शीटाकळी तालुक्यात ५.८ मिमी पाऊस झाला. त्यामुळे १५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, तर १३२ शेतकऱ्यांना गारपीट, अवकाळी पावसाचा फटका बसला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.