आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन‎:घरकुल मंजूर लाभार्थ्यांसाठी‎ आजपासून चार दिवस मेळावा‎

अकोला‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मंजूर‎ झालेल्या लाभार्थ्यांनी अद्यापही नकाशा‎ मंजुरी तसेच गुंठेवारीचे नियमानुकूल‎ करण्याबाबतचे कागदपत्र सादर केलेले‎ नाही. अशा दोन हजार ३८१ घरकुल‎ लाभार्थ्यांसाठी शुक्रवार दि. ३ पासून‎ सोमवार ६ पर्यंत दररोज सकाळी ११‎ वाजता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन‎ करण्यात आले आहे. या चार दिवस‎ चालणाऱ्या मेळाव्यात लाभार्थ्यांनी‎ सहभागी होऊन कागदपत्रांची पूर्तता‎ करावी, असे आवाहन महापालिका‎ प्रशासनाने केले आहे.‎

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत गुंठेवारी‎ पद्धतीच्या प्लॉट धारकांचेही घरकुले मंजूर‎ झाली आहेत. जर प्लॉट गुंठेवारी पद्धतीचा‎ असेल, तर घरकुलाच्या लाभासाठी‎ नियमानुकूल करणे गरजेचे आहे.‎ यासाठीच फेब्रुवारी महिन्यात‎ महापालिकेच्या मुख्य सभागृहात‎ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ या मेळाव्यात शेकडो लाभार्थ्यांनी हजेरी‎ लावली.

प्रभाग निहाय मेळावा‎
शुक्रवार दि. ३ रोजी प्रभाग क्रमांक १,‎ २, ३, ४ या प्रभागातील मंजुर‎ लाभार्थ्यांसाठी मेळावा आयोजित‎ करण्यात आला आहे.‎ शनिवार दि.४ रोजी प्रभाग क्रमांक ५,‎ ६, ७, ८ या प्रभागातील मंजुर‎ लाभार्थ्यांसाठी मेळावा आयोजित‎ करण्यात आला आहे.‎ रविवार दि. ५ रोजी प्रभाग क्रमांक ९,‎ १०, १३, १४ या प्रभागातील मंजुर‎ लाभार्थ्यांसाठी मेळावा आयोजित‎ करण्यात आला आहे.‎ सोमवार दि. ६ रोजी प्रभाग क्रमांक‎ १७, १८, १९, २० या प्रभागातील मंजुर‎ लाभार्थ्यांसाठी मेळावा आयोजित‎ करण्यात आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...