आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:कोठारीत गावठी दारू साठा जप्त,‎ 45  हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट‎

मंगरूळपीर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोठारी येथे रविवार‎ दि. ५ राेजी दुपारी पाेलिसांनी छापा टाकून गावठी‎ दारूचा साठा जप्त केला. यावेळी ४५ हजार‎ रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. पाेलिसांनी‎ दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक‎ निलेश शेंबडे व अंकुश वडतकर, पाेलिस शिपाई‎ जितेंद्र ठाकरे व प्रमोद ठाकरे, होमगार्ड हकीम,‎ सोळंके यांच्या पथकाने कोठारी येथे अवैधरीत्या‎ गावठी दारू विक्री करणारे रतन मैघने यांच्यावर‎ कारवाई केली.

त्यांच्याकडून १५ लिटर गावठी‎ दारू, ३०० लिटर हातभट्टी दारुसाठी लागणारे ३००‎ लीटर कच्चे रसायन असा ४५ हजार रुपये‎ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पथकाने‎ कारवाई करत सदर मुद्देमाल जागेवरच नष्ट करत‎ संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...