आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसाधारण सभा:जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 21 जूनला ; जुलैत पहिल्या अडीच वर्षाचा कार्यकाळ संपणार

अकोला16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा २१ जूनला होणार असून, विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षा, सभापती यांची पदाधिकारी म्हणून ही अखेरची सभा राहणार आहे. सभेच्या विषयसूचीवर एकूण ९ विषयांचा समावेश आहे. जानेवारी २०२०मध्ये जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता स्थापन झाली होती. जुलैत पहिल्या अडीच वर्षाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे २१ जूनला होणारी सर्वसाधारण सभा ही विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या पहिल्या टर्ममधील शेवटची राहणारआहे. त्यामुळे या सभेच्या विषय सूचीवर पाणी पुरवठ्यासह अन्य प्रलंबित विषय निकाली निघण्यासाठी नमूद असते, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. न्यायप्रविष्ट प्रकरणही विषय सूचीवर ः ओबीसी आरक्षणामुळे जि.प.च्या रिक्त झालेल्या दोन सभापतिपदांच्या निवडणुकीत वंचितचा पराभव करीत महाविकास आघाडीने २९ ऑक्टोबर रोजी बाजी मारली होती. महिला बाल कल्याण सभापतीपदाच्या निवडणुकीत स्फूर्ती गावंडे तर, विषय समिती सभपतीपदासाठी सम्राट डोंगरदिवे यांची अविरोध निवड झाली होती. मात्र निवडणूक प्रक्रियेवर वंचितच्या सदस्याने आक्षेप घेतल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित झाले. तरीही २१ जूनला होणाऱ्या सभेच्या विषय सूचीवर सभापतींना विषय समित्यांचा प्रभार सोपवण्याचा विषय क्रमांक २ वर नमूद केला आहे. हे आहेत विषय ः विषय सूचीवर एकूण ९ विषयांचा समावेश आहे. यात २३ मार्चला झालेल्या सभेचे इतिवृत्त मंजूर करणे, शाळा खाेली बांधकाम व अन्य साहित्याच्या लिलावातून मिळालेली रक्कम खर्च करण्यास मंजुरी देणे, दहिहंडा येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा हस्तांरित करणे, भटोरी व खिरपुरी येथील आराेग्य उपकेंद्राची कामाची निविदा स्वीकरणे आदी िवषयांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...