आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढाकार:कर्णबधीर मुलांचा सामान्य शाळेत प्रवेश; एकवीरा फाउंडेशनचा पुढाकार

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्णबधीर बालकांच्या सुप्त गुणांना उजाळा देण्यासाठी शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या जठारपेठ परिसरातील ज्योती नगर येथील एकविरा मल्टीपर्पज फाउंडेशनद्वारे संचालित बालविकास केंद्राच्या कर्णबधीर मुलांच्या शाळेत रविवारी कर्णबधीर बालकांना निरोप समारंभ झाला. या शाळेतील ११५ हून अधिक विद्यार्थी सर्वसामन्यांच्या प्रवासात गेले असून, यावर्षी बालविकास केंद्रातील ६ कर्णबधीर मुलांच्या सर्व सामन्यांच्या प्रवाहातील प्रवासाला सुरुवात झाली. आपल्या कमतरतेला आपली ताकद बनवून ही बालके पारंपरिक शाळेत शिकायला जाणार आहेत. शाळेतील निरोप समारंभात या ६ विद्यार्थ्यांनी सज्ज असल्याचे दाखवून दिले.

यावर्षी साई असंबे, तनिष्का राखोंडे, विहान शेळके, प्रियांका मस्के, आराध्य पाचडे, श्रद्धा धोटे या विद्यार्थी शाळेतून निरोप घेऊन पुढील आयुष्याला सुरुवात करणार आहेत. या निरोप समारंभात पाहुणे म्हणून डॉ. सदानंद भुसारी, डॉ. संकेत अग्रवाल, सी. एन. देशमुख, देशमुख, एकविरा मल्टीपर्पज फाउंडेशनचे ट्रस्टी अरुण दामले, चिन्मय दामले, स्नेहल भोपळे, थोप, संवाद सख्या ग्रुपच्या सदस्या माणिक नेरकर, कल्पना पांडे, अंजली केळकर, अर्चना मुळे, गोखले, फाटक आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात कोरोना काळात विद्यार्थ्यांना गृहभेटीद्वारे शिक्षण देण्यासाठी घरातील जागा देणाऱ्या थोप व स्नेहल भोपळे, कॅन्सरवर मात करीत मुलीला शिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या कृष्णालीच्या आई शारदा माळी यांचा सत्कार केला.

सोहळ्यात बालविकास शाळेच्या चिमुकल्यांनी संचालन, कार्यक्रमाची धूरा सांभाळली. यावेळी गाणे व स्पिचमध्ये विहान कबीर शेळके, हितेश ठाकरे, साई असंबे, विवेक जाधव, श्रद्धा धोटे व पालकांनी सहभाग घेतला. पिंकी जाधव, मधुर शेळके, देशमुख यांनी मनोगत मांडले. नृत्यकलेत अर्जुन जोशी, कृष्णली माळी, नैन्सी सोळंके, तन्वी देशमुख, हर्ष इंगोले आदी बालके कौतुकास पात्र ठरले. बालकांना यावेळी भेटवस्तू दिल्यात. प्रस्तावना योगिता बोधडे, संचालन सारिका कांडलकर, आभार यशोदा नवलखे यांनी मानले. सोहळ्यात प्रल्हाद बन्सोड, संचालिका सुचिता बनसोड, श्रीकांत बनसोड, आशिष कांडलकर, नीलिमा पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...